दही हे भारतीय आहारातील अविभाज्य भाग आहे. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत (Curd Making). दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. दह्याचे अनेक गोष्टी करण्यात येतात (Kitchen Tips). ताक, लस्सी, कढी यासह अनेक भाज्यांमध्ये दह्याचा वापर होतो. काही जण जेवणासोबतही दही खातात. पण घरात विकतसारखे दही तयार होत नाही.
घट्ट - कापता येईल असे गोडसर दही फक्त मिठाईच्या दुकानात मिळते. जर आपल्याला कापता येईल इतके घट्ट दही करायचं असेल तर, या काही टिप्स फॉलो करून पाहा. दही अजिबात पातळ होणार नाही, त्याला पाणी सुटणार नाही. शिवाय दह्याची आंबट चवही लागणार नाही. चवीला गोड आणि घट्ट दही कसं लावावं? पाहा(How to Make Curd (Dahi - Indian Yogurt)).
दही लावण्याची योग्य पद्धत
- दही लावण्यासाठी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात आधी एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. दूध कोमट होण्यासाठी ठेवा.
तुम्ही गरजेपेक्षा जास्त साखर खात आहात, शरीर देते ६ संकेत; दुर्लक्ष केलं तर ' ही ' शिक्षा अटळ
- दूध थंड झाल्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये दही ब्रशने लावा. किंवा त्या बाऊलमध्ये फेटलेलं दही घ्या. नंतर त्यात दूध घाला.
- दूध दह्याच्या भांड्यात घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. आणि भांडं हलवू नका. आपण झाकणावर जाड सुती कापड टाकून गुंडाळू शकता. जेणेकरून भांड्याची उष्णता टिकून राहील.
प्रेशर कुकरमध्ये अगदी १० मिनिटांत करा ढोकळा; शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक आणि झटपट पदार्थ
- किमान ८ ते १० तास दह्याचे भांडे खोलीच्या तापमानाला ठेवा. जेणेकरून दही व्यवस्थित सेट होईल.
- दही पूर्णपणे सेट झाल्यावर भांडे हलक्या हाताने उचलून २-३ तास फ्रिजमध्ये ठेवा.
- नंतर आपल्याला दिसून येईल, दही कापता येईल इतके घट्ट तयार होईल. अशा प्रकारे दही खाण्यासाठी रेडी.