Join us  

घट्ट, मलईदार दही घरीच बनवण्याची सोपी ट्रिक; १ पदार्थ वापरा, कमी वेळात बनेल परफेक्ट दही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 10:33 AM

How to make curd instantly : घरच्याघरी दही बनवल्यास रोज बाहेरून विकत आणण्याची गरज नसते आणि अस्सल चवीचं घरगुती दही खाण्याचा आनंद घेता येतो.

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांच्याच घरी दही आणि दह्याचे पदार्थ खाल्ले जातात.  दुपारच्या जेवणात दही खाल्यानं शरीराला गारवा मिळतो खाल्लेल्या अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं. (How To Make Curd) एकदा जेवताना दही खाण्याची सवय झाली तर दही नसल्याशिवाय जेवणच जात नाही किंवा काहीजणांना  जेवण झाल्यानंतर थंडगार ताक पिण्याची सवय असते. नेहमी बाजारातून दही आणणं शक्य होतंच असं नाही. (How to make curd or dahi at home)

घरच्याघरी दही बनवल्यास रोज बाहेरून विकत आणण्याची गरज नसते आणि अस्सल चवीचं घरगुती दही खाण्याचा आनंद घेता येतो. पण घरी व्यवस्थित दही लागत नाही अशी तक्रार अनेकजण करतात. दह्यात पाणीच जास्त होतं, दही खूप आंबट होतं अशा समस्या जाणवतात. घरच्याघरी दही बनवण्याची परफेक्ट पद्धत पाहूया.

दही खाण्याचे फायदे

१) वेट लॉस करायचे असेल तर आहारात दह्याचा समावेश करू शकता. दह्यामध्ये असलेले गुणधर्म फॅट्स नियंत्रित करण्यास मदत करतात.

२) दही खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात दह्याचा समावेश केला जाऊ शकतो.

3) दह्यामध्ये असलेले गुणधर्म पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, जुलाब यासारख्या समस्या टाळता येतात.

4) दह्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकता.

5) त्वचेला चमकदार बनवण्यासाठी दही वापरता येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए, झिंक त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स