ऋतू कोणताही असो भारतीय स्वयंपाकघरात दही (Curd) ताकाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात दही जास्त प्रमाणात खाल्लं जातं तर पावसाळ्यात दह्याची कढी, दही वडा, दही भात असे पदार्थ करण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. (How to make curd instatly) नेहमी बाहेरून दही विकत आणण्यापेक्षा घरच्याघरी दही बनवलं तर अधिक तब्येतीसाठी अधिक पौष्टीक ठरेल. (How to make Curd Homemade Indian Yogurt)
पण घरी दही लावताना ते पातळ होतं, आंबट होत नाही किंवा जास्तच आंबट होतं, दही घट्ट होतं नाही अशी अनेकांची तक्रार असते. तर कधी घरात विरजण नसल्यामुळे दही बाहेरून आणण्याशिवाय काही पर्याय नसतो. घरच्याघरी १५ मिनिटांत दही लावणं अगदी सोपं आहे. दही कसं लावायचं ते पाहूया. (How to make curd without curd)
लिंबू
विरजणाशिवाय दही लावण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात दूध घ्या. त्यात अर्धा लिंबू पिळा. आता एका चमच्याच्या मदतीनं हळूहळून मिसळा. यावर झाकण ठेवा आणि १२ तासांसाठी वेगळे ठेवा. तुम्ही सुती कापडानं दही कव्हर करू शकता. जेणेकरून ते गरम राहील. पटकन दही लावण्यासाठी सगळ्यात आधी कॅसरॉलमध्ये थोडं गरम पाणी करा. त्यात दह्याचं भाडं ठेवून बंद करा. २ तासांसाठी हे भाडं अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान जास्त असेल. २ तासांनी दही तयार झालेलं असेल.
मिरची
मिरचीचा वापर करूनही तुम्ही इंस्टंट दही लावू शकता. सगळ्यात आधी दूध उकळवून थंड करून घ्या. त्यानंतर त्यात मिरच्याच्या देठासह हिरवी मिरची घाला. मिरची दुधात मिसळून हे दूध कोरड्या कापडाने झाकून तसेच ठेवा. सकाळपर्यंत दही तयार झालेलं असेल.
लाल मिरची
हिरव्या मिरचीप्रमाणे लाल मिरचीसुद्धा तितकीच उपयोगी ठरते. दही लावण्यासाठी सुकी लाल मिरची उकळून घेतलेल्या दूधात ७ ते ८ तासांसाठी घाला. नंतर दही लागलेलं तुम्हाला दिसून येईल.
चांदीचा शिक्का किंवा अंगठी
चांदीचा शिक्का किंवा अंगठी दूधात घालून ८ तासांसाठी गरम ठिकाणी ठेवा. हा दही लावण्याचा उत्तम पर्याय आहे.