उन्हाळ्याच्या दिवसात सगळेचजण दही आवडीनं खातात. दुपारच्या जेवणाला ताक लागतंच असे अनेकजण आहेत. ताकाचे सेवन तब्येतीसाठी उत्तम ठरते. नेहमी बाहेरून दही आणण्यापेक्षा घरच्याघरी दही लावल्यास ते तब्येतीसाठी अधिक पौष्टीक ठरेल. (How to make perfect curd at home) घरच्याघरी दही लावण्याच्या अनेक सोप्या ट्रिक्स आहेत. पण प्रत्येकालाच परफेक्ट दही लावणं जमतंच असं नाही. कधी दही जास्तच आंबट होतं तर कधी दह्यात पाणी जास्त होतं. विरजणाशिवाय घरच्याघरी दही लावण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया. (Curd Making Tips)
हिरवी मिरची
सगळ्यात आधी दूध व्यवस्थित गरम करून घ्या. नंतर दूध एका भांड्यात कोमट होईपर्यंत ठेवा. नंतर या दूधात दोन हिरव्या मिरच्या घाला. (How to make curd or dahi at home) मिरच्यांचे देठ व्यवस्थित असतील याची काळजी घ्या. मिरची दूधात पूर्णपणे बुडायला हवी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दूध एखाद्या गरम ठिकाणी ६ तासांसाठी झाकून ठेवा. या पद्धतीनं बिना विरजणाचे दही तयार होईल.
लिंबू
लिंबू वापरून दही लावण्यासाठी कोमट दुधाचा वापर करा. कोमट दुधात २ चमचे लिंबाचा रस पिळून घाला. ६ ते ७ तासांसाठी झाकून ठेवा. या पद्धतीनं परफेक्ट दही तयार होईल.
चांदीचा शिक्का किंवा अंगठी
कोमट दुधात चांदीचा शिक्का किंवा चांदीची अंगठी घाला. नंतर दूध गरम करून त्यात घाला आणि ८ तासांसाठी झाकून ठेवा. दही लावण्याची ही सोपी ट्रिक आहे. दही लावल्यानंतर हा शिक्का किंवा अंगठी काढायला विसरू नका.
हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम
लाल मिरची
फक्त हिरवी मिरचीच नाही तर लाल मिरचीचा वापर करूनही तुम्ही दही लावू शकता. जर घरात हिरवी मिरची नसेल तर मसाल्याच्या डब्यातील लाल मिरची वापरून तुम्ही दही लावू शकता. लाल मिरचीनं दही लावण्यासाठी तुम्हाला सुकलेल्या लाल मिरच्या लागतील. लाल मिरच्या ७ ते ८ तासांसाठी कोमट दूधात घालून ठेवा. हा उपाय केल्यास घट्ट दही लवकर तयार होण्यास मदत होईल.