दही हा आपल्या रोजच्या जेवणातील अतिशय महत्वपूर्ण पदार्थ आहे. रोजच्या जेवणात आपण दह्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश करतो. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या बाजारात विविध ब्रॅन्डचे फ्लेवर्ड दही सहज उपलब्ध होते. परंतु घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच असते. दही हे केवळ आरोग्यासाठीच चांगले नाही तर ते त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर देखील आहे. मलईदार, स्वादिष्ट दही हा जगातील सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक मानला जातो. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आपल्यापैकी बरेचजण दही घरच्या घरी बनवतात तर काहीवेळा आपण दही बाहेरून विकत देखील आणतो. घरच्या दह्याला जो घट्टसरपणा व चव असते ती विकतच्या दह्याला येत नाही. विकतचे दही बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा डब्यांतून दिले जाते. काहीवेळा बाहेरुन विकत आणलेले दही कधी पातळ, पाणचट किंवा आंबट असते. त्यामुळे घरीच दही तयार करणं हे उत्तम मानलं जात. मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाच ते दहा मिनीटांमध्ये आपण दह्याला विरजण लावू शकता. मात्र कधी कधी घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही. काहीवेळा दही लावण्यासाठी आपल्याकडे विरजणाला दूधच नसते अशावेळी नेमके काय करायचे असा प्रश्न घरच्या गृहिणीला पडतो. दुधाचा वापर न करता देखील आपण घरच्या घरी दही तयार करू शकतो त्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How To Make Curd Or Dahi At Home : Homemade Dahi Recipe).
दुधाशिवाय दही तयार करण्याची एक सोपी ट्रिक :-
साहित्य :-
१. पाणी - ३ ते ४ कप
२. मिल्क पावडर - २ ते ३ टेबलस्पून
३. दही - २ टेबलस्पून
साय आवडत नाही, फेकून देता? साय खाण्याचे ५ फायदे- त्वचा चमकदार-हाडं मजबूत...
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मिल्क पावडर घालावी.
२. ही मिल्क पावडर पाण्यात संपूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळून घ्यावी.
३. मिल्क पावडरच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घेऊन पाण्यांत मिल्क पावडर मिसळून घ्यावी.
४. आता गॅसच्या मंद आचेवर ठेवून हे दूध उकळवून घ्यावे.
५. दूध उकळून गरम झाल्यानंतर ते पूर्ण थंड करून घ्यावे.
स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...
आता कॉफी क्युब्स वापरून केवळ २ मिनिटांत बनवा इन्स्टंट कॉफी ! या कॉफी क्युब असतात काय?
६. दूध संपूर्णपणे गार झाल्यानंतर ते एका वेगळ्या भांड्यात ओतून घ्यावे.
७. आता थोडे दूध एका वेगळ्या हंड्यात काढून घेऊन त्यात २ टेबलस्पून दही मिसळावे. ते चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे.
८. आता हे दही मिसळून घेतलेले दूध बाजूला ठेवलेल्या दुधामध्ये ओतून घ्यावे आणि चमच्याने हळूहळू ढवळत राहावे.
९. आता हे तयार झालेले मिश्रण शक्यतो एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बाऊलमध्ये काढून घ्यावे.
१०. या बाऊलवर झाकण ठेवून हा बाऊल ५ ते ६ तासांसाठी तसाच झाकून ठेवावा.
५ ते ६ तासानंतर आपले घरच्या घरी बनलेले घट्टसर दही खाण्यासाठी तयार आहे.