Join us  

Video : विरजणाशिवाय परफेक्ट दही लावण्याची सोपी ट्रिक; थंडीतही घरीच बनेल विकतसारखं दही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 5:12 PM

How to make curd without curd : सगळ्यात आधी दूध उकळून थंड करायला ठेवा. दूध कोमट झाल्यानंतर एका लहान वाडग्यात घाला. 

दुपारच्या जेवणात बरेचजण दही किंवा ताक घेणं पसंत करतात. पण थंडीच्या दिवसात दही खाणं टाळलं जातं. कारण घरी दही व्यवस्थित लागत नाही आणि शरीरालाही ऊब देणारे पदार्थ खाण्याची गरज असते. (How to make curd without curd) अशावेळी दह्याची कढी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या  जेवणासाठी बनवू शकता. कढी करायला जास्त वेळही लागत नाही. यासाठी तुम्ही घरी बनवलेलं ताजं दही वापरू शकता. थंडीच्या दिवसात परफेक्ट दही लावण्याची सोपी ट्रिक या लेखात पाहूया (How to make curd at home)

घरी दही लावण्यासाठी लागणारं साहित्य

साहित्य:-

दूध

२ ताज्या हिरव्या मिरच्या देठासकट

कृती

१) सगळ्यात आधी दूध उकळून थंड करायला ठेवा. दूध कोमट झाल्यानंतर एका लहान वाडग्यात घाला. 

२) त्यात देठासह 2 मिरच्या घाला (मिरचीचे देठ दुधात बुडायला हवे.) 

३) १० ते १२ तास उबदार ठिकाणी ठेवा.  ओव्हनमध्ये किंवा एखादं कापड गुंडाळूनही तुम्ही ठेवू शकता. 

४) १० ते १२ तासांनी तयार होईल होममेड फ्रेश दही.  हे दही तुम्ही जेवणात वापरून कढी, दहीवडे असे पदार्थ बनवू शकता किंवा आवडीनुसार ताकही पिऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स