Lokmat Sakhi >Food > थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट

थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट

Sitaphal Shake Recipe: सध्या बाजारात खूप सिताफळं आली आहेत. त्यामुळे घरच्या घरी सिताफळ मिल्कशेक कसा करायचा, त्याची ही रेसिपी एकदा बघून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 09:44 PM2022-11-07T21:44:03+5:302022-11-07T21:58:46+5:30

Sitaphal Shake Recipe: सध्या बाजारात खूप सिताफळं आली आहेत. त्यामुळे घरच्या घरी सिताफळ मिल्कशेक कसा करायचा, त्याची ही रेसिपी एकदा बघून घ्या.

How to make custard apple milkshake at home? Sitaphal shake recipe | थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट

थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट

Highlightsसिताफळामध्ये व्हिटॅमिन सी, ए, रायबोफ्लेविन, थायमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस हे घटकही मोठ्या प्रमाणात असतात.

सध्या बाजारात भरपूर प्रमाणात सिताफळं (custard apple) आलेली आहेत. शिवाय त्यांचे दरही सर्वसामान्यांना परवडेल असेच आहेत. वर्षातून मोजके काही महिनेच उपलब्ध असणारं हे फळं त्यामुळे सध्या उपलब्ध आहे, तर मुबलक प्रमाणात खाऊन घ्यावं. कारण या फळामध्ये लोह (Benefits of eating Sitaphal) भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अशक्तपणा घालविण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. शिवाय सिताफळामध्ये व्हिटॅमिन सी, ए, रायबोफ्लेविन, थायमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस हे घटकही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे असं आरोग्यदायी फळ या काळात खायलाच हवं. सिताफळ मिल्कशेक (custard apple OR Sitaphal shake recipe) बनवणंही अतिशय सोपं आहे. त्याचीच रेसिपी इन्स्टाग्रामच्या home_entertainment_and_vlog या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

सिताफळ मिल्कशेक कसा करायचा?
साहित्य

२ सिताफळं, 

अर्धा ग्लास दूध, 

सायली संजीवची मायेची गोधडी... बघा आजी- आईच्या जुन्या साड्यांपासून कशी शिवली आठवणींची गोधडी

२ टेबलस्पून साखर, 

बदाम- काजू असा सुकामेवा, 

व्हॅनिला आईस्क्रिम

 

कृती
१. सगळ्यात आधी सिताफळाच्या बिया एका चाळणीत काढून सिताफळाचा गर काढून घ्या.

२. हा गर मिक्सरमधून काढून बारीक करून घ्या.

३. बारीक करताना त्यात थोडं दूध आणि साखर घाला.

सिझेरिअननंतरही उत्तम फिटनेस सांभाळणाऱ्या ७ अभिनेत्री; त्या सांगतात सिझरविषयीचे गैरसमजच जास्त कारण..

४. हे मिश्रण एका ग्लासमध्ये ओता. त्यात वरून सिताफळाचा गर आणि २ टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रिम टाका.

५. सगळ्यात शेवटी वरून काजू- बदाम, पिस्ता अशा तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे काप करून टाका.

फक्त एक पांढरा खडू आणि फळा.. बघा 'तिने' कसं सुंदर चित्र रेखाटलं!

६. दुपारी जेवण झाल्यानंतर किंवा सायंकाळी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही हा शेक घेऊ शकता.

७. सिताफळ थंड असल्यामुळे ज्यांना सर्दीचा त्रास आहे, त्यांनी रात्रीच्या वेळी सिताफळ मिल्कशेक पिणं टाळावं.


 

Web Title: How to make custard apple milkshake at home? Sitaphal shake recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.