Lokmat Sakhi >Food > कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

How To Make Cutlets Pattis Crispy At Home : Tips For Making Cutlets Pattis Crispy : कटलेट्स, पॅटिस करताना ते परफेक्ट कुरकुरीत किंवा क्रिस्पी होण्यासाठी वापरा हे खास ६ पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 09:40 AM2024-10-10T09:40:00+5:302024-10-10T09:40:01+5:30

How To Make Cutlets Pattis Crispy At Home : Tips For Making Cutlets Pattis Crispy : कटलेट्स, पॅटिस करताना ते परफेक्ट कुरकुरीत किंवा क्रिस्पी होण्यासाठी वापरा हे खास ६ पदार्थ...

How To Make Cutlets Pattis Crispy At Home tips for making Cutlets Pattis Crispy | कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

सकाळच्या नाश्त्याला उपमा, पोहे, थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ आपण खातो. पण नाश्त्याला हे नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की आपण काहीतरी वेगळं ट्राय करतो. नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं म्हटलं की कटलेट्स किंवा पॅटिस असे पदार्थ करतो. सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक, पोटभरीचे आणि हेल्दी म्हणून आपण कटलेट्स किंवा पॅटिस खाऊ शकतो. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं नाश्त्यात असे चमचमीत, चटपटीत कटलेट्स, पॅटिस खायला आवडतात(Tips For Making Cutlets Pattis Crispy).

हिरवी चटणी किंवा सॉस सोबत हे कटलेट्स, पॅटिस खायला आणखीनच चविष्ट लागतात. लहान मुलांना टिफिनमध्ये देखील आपण कटलेट्स, पॅटिस  देऊ शकतो. रात्रीची उरलेली भाजी किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य या कटलेट्स, पॅटिसमध्ये मिक्स करून आपण ते अधिक पौष्टिक करु शकतो. कटलेट्स, पॅटिस हे कुरकुरीत, क्रिस्पी असतील तरच ते खायला छान लागतात. कटलेट्स, पॅटिस करायचं म्हटलं की अनेक गृहिणींची एक कॉमन तक्रार असते ती म्हणजे कटलेट्स, पॅटिस क्रिस्पी होत नाहीत किंवा त्यांना हवा तसा कुरकुरीतपणा येत नाही. कटलेट्स, पॅटिस घरी करताना ते परफेक्ट कुरकुरीत किंवा क्रिस्पी व्हावेत यासाठी आपण काही सोप्या ट्रिक्स वापरुन पाहू शकतो(How To Make Cutlets Pattis Crispy At Home).

कटलेट्स, पॅटिस क्रिस्पी होण्यासाठी काय करावे ?  

१. ब्रेडस्क्रम्स :- ब्रेडस्क्रम्सचा वापर करून आपण कटलेट्स, पॅटिस क्रिस्पी करु शकतो. यासाठी कटलेट्स किंवा पॅटिसचे सारण तयार करून घेतल्यानंतर त्यात चमचाभर ब्रेडस्क्रम्स घालावेत. याचप्रमाणे कटलेट्स, पॅटिस तळण्याआधी ते ब्रेडस्क्रम्समध्ये घोळवून घ्यावेत.  ब्रेडस्क्रम्समध्ये कटलेट्स,पॅटिस घोळवून घेतल्याने त्यांचे बाहेरचे आवरण अगदी क्रिस्पी होते, यामुळे कटलेट्स, पॅटिस खाताना कुरकुरीत लागतात. 

कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्याचा 'असा' करा वापर, इवलुशा देठाचे माहित नसतील इतके उपयोग...

२. रवा :- कोणताही पदार्थ कुरकुरीत, क्रिस्पी करण्यासाठी रव्याचा वापर केला जातो. यासाठी कटलेट्स किंवा पॅटिसचे सारण तयार करताना आपण त्यात थोडासा रवा घालू शकता. यासोबतच कटलेट्स, पॅटिस तळण्याआधी समप्रमाणात रवा - बेसन घेऊन ते एकत्रित करून या मिश्रणात कटलेट्स किंवा पॅटिस घोळवून घ्यावेत आणि मग तेलात तळण्यासाठी सोडावेत यामुळे कटलेट्स किंवा पॅटिस क्रिस्पी होतात. 

३. सिक्रेट पावडर :- कटलेट्स, पॅटिस क्रिस्पी करण्यासाठी आपण खाकरा, पोहे, कुरमुरे यापासून तयार झालेल्या एका सिक्रेट पावडरचा वापर करु शकता. यासाठी एका मिक्सरजारमध्ये खाकऱ्याचे बारीक तुकडे, पोहे, कुरमुरे हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सर फिरवून या तिन्ही पदार्थांची एकदम बारीक पूड करून घ्यावी. ही पूड आपण कटलेट्स, पॅटिसच्या सारणात घालावी. या सिक्रेट पावडरचा वापर केल्याने कटलेट्स, पॅटिस एकदम क्रिस्पी, कुरकुरीत होतील. 

नवरात्र स्पेशल : खाऊन तर पाहा साबुदाण्याचे कस्टर्ड, साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा भारी पौष्टिक पदार्थ...

४. तांदुळाचे पीठ :- तांदुळाच्या पिठाचा वापर करून देखील आपण कटलेट्स, पॅटिस क्रिस्पी करु शकता. यासाठी कटलेट्स, पॅटिसचे सारण तयार करताना त्यात थोडेसे तांदुळाचे पीठ घालावे. तसेच जर आपण हे कटलेट्स, पॅटिस जर बेसन पीठ किंवा इतर कोणत्याही बॅटरमध्ये घोळवून घेणार असाल तर त्यात देखील थोडेसे तांदुळाचे पीठ घातल्याने कटलेट्स, पॅटिस कुरकुरीत होतात. 

उपवास स्पेशल : खा पोटभर पौष्टिक राजगिऱ्याचा थेपला, कमी वेळात झटपट करता येईल असा पदार्थ...

५. कॉर्नफ्लॉवर :- कॉर्नफ्लॉवरने देखील पदार्थांना कुरकुरीतपणा येतो. यासाठी कटलेट्स, पॅटिस किंवा टिक्की कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून मग तळण्यासाठी तेलात सोडावे, यामुळे कटलेट्स, पॅटिस परफेक्ट क्रिस्पी होतात. 

६. बेसन :- बेसन पिठाच्या मदतीने देखील कटलेट्स, पॅटिस यांना कुरकुरीतपणा येऊ शकतो. यासाठी कटलेट्स, पॅटिसच्या सारणात बेसन घालावे. याचप्रमाणे कटलेट्स, पॅटिस बेसन पिठात घोळवून मग तळण्यासाठी तेलात सोडावे, यामुळे कटलेट्स, पॅटिसचे बाहेरचे आवरण कुरकुरीत होते.  

Web Title: How To Make Cutlets Pattis Crispy At Home tips for making Cutlets Pattis Crispy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.