Join us  

दह्याची कढी तर नेहमीच खातो, एकदा चाखून पहा 'दही तडका '... गरमागरम पोळी व भातासोबत लागेल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 1:00 PM

dhaba style dahi tadka recipe in 5 minutes for roti & rice : साधी महाराष्ट्रीयन कढी तर आपण नेहमीच खातो, आता एकदा दही तडक्याचा फक्कड बेत होऊनच जाऊ दे...

'दही' हा आपल्या रोजच्या जेवणातील अतिशय महत्वपूर्ण पदार्थ आहे. रोजच्या जेवणात आपण दह्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश करतो. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो(Tadke Wali Dahi).

आपल्या जेवणात दह्यापासून बनवलेली रायती, कोशिंबिरी, चटण्या यांबरोबर सगळ्यांची लाडकी कढी देखील बनवली जाते. रोजच्या जेवणात त्याच त्या डाळी, वरण, आमटी खाऊन कंटाळा आला की आपण चपाती व भातासोबत खाण्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून कढी (Dahi Tadka - Spiced Yogurt Curry) बनवतो. आपल्याकडे शक्यतो दही व ताक या दोघांचा वापर करुन कढी बनवली जाते. ताकाची कढी ही जराशी पातळ, आणि आले,लसूण, मिरच्यांचा खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटलेला ठेचा लावून तयार केलेली असते, भातासोबत किंवा अशीच ओरपण्यासाठी ही पातळ कढी छान लागते. याउलट घरचे ताजे घट्ट दही वापरून घट्टसर कढी केली जाते. याच सोप्या ट्रिकचा वापर करुन आपण घरीच छान दही तडका (Dahi Tadka: Quick & Easy Comfort Food) बनवू शकतो. हा प्रकार थोडाफार कढी सारखाच असतो परंतु थोडा घट्ट असल्यामुळे आपण तो चपाती किंवा भातासोबत खाऊ शकतो. दही तडका बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Dahi Tadka: 5 Minute Quick Recipe For Lunch & Dinner).  

साहित्य :- 

१. तेल - १ टेबलस्पून २. मोहरी - १ टेबलस्पून ३. जिरे - १ टेबलस्पून ४. कडीपत्ता - ६ ते ७ पाने ५. लाल सुक्या मिरच्या - २ ते ३ ६. कांदा - १ कप (उभा चिरुन घेतलेला)७. आलं - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेलं)८. कसुरी मेथी -  १ टेबलस्पून९. कोथिंबीर -  १ टेबलस्पून१०. दही - २ कप ११. मीठ - चवीनुसार १२. हळद - चिमूटभर १३. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 

मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरून घेतलेलं आलं, कसुरी मेथी, मीठ, हळद घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. २. ही खमंग फोडणी ३ ते ५ मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित सुंगंध येईपर्यंत परतून घ्यावी.

शेफ कुणाल कपूर सांगतो ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट क्रिस्पी पराठा होण्यासाठी ६ टिप्स...

गुजराथी कढी पकोड्याची पारंपरिक रेसिपी, मारा फुरका - जेवण होईल मस्त पोटभर...

३. आता गॅस बंद करुन भांडे गॅसवरुन उतरवून घ्यावे, त्यानंतर या खमंग फोडणीत घरचे लावलेले ताजे घट्ट दही घालावे व चमच्याने ढवळून घ्यावे. ४. सगळ्यांत शेवटी आपल्या आवडीनुसार या दही तडक्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

मस्त घरच्या ताज्या दह्याचे दही तडका खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भातासोबत दही तडका खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती