Join us  

तेच तेच खाऊन कंटाळलात? ५ मिनिटांत करा दाल फ्राय; सोपी-झटपट रेसिपी, जेवा पोटभर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:33 PM

How to make dal fry premix : हॉटेलसारखं चमचमीत दाल फ्राय बनवणं एकदम सोपं आहे. (Instant dal recipe in 5 mins)

नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. वरण भात आपल्या सर्वांच्याच जेवणातील महत्वाचा भाग आहे. त्याच त्याच चवीचा डाळ भात खाऊन  नेहमीच कंटाळा येतो. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर लोक दाल फ्राय तितक्याच आवडीनं खातात. (Instant Dal Premix) हॉटेलसारखा चमचमीत दाल फ्राय बनवणं एकदम सोपं आहे. (Instant dal recipe in 5 mins)  यासाठी तुम्हाला नेहमी वेळही घालवावा लागणार नाही. डाळ फ्राय प्री मिक्स बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make dal fry premix)

दाल फ्राय प्री मिक्स बनवण्याची रेसिपी (Instant dal recipe in 5 mins with homemade ready to eat)

१) दाल फ्राय प्री मिक्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी तुरीची डाळ, एक वाटी मसूरची डाळ, एक वाटी मूगाची डाळ भाजून घ्या.

२) भाजल्यानंतर याची पेस्ट तयार करा. पेस्ट केल्यानंतर एका भांड्यात बाजूला ठेवून द्या.

३) कढईत तेल घालून त्यात जीरं आणि छोट्या लाल मिरच्या घाला. त्यात लाल तिखट घालून तेलात मिसळ्यानंतर त्यात डाळींची पावडर घाला.

४) ही पेस्ट एकजीव केल्यानंतर यात १ टिस्पून धणे पावडर, सुक्या कांद्याची पावडर, लसणाची पावडर, सुकी मिरची, सुकवलेले आलं घालून एकजीव करा. तयार आहे गरमागरम दाल फ्राय प्रीमिक्स. 

ही पावडर तुम्ही एक महिनाभर साठवून टिकवून ठेवू शकता.  कधीही डाळ बनण्यासाठी सगळ्यात आधी तेलात फोडणी घालून त्यात टोमॅटो घाला मग पाणी घाला.  पाण्याला उकळ आल्यानंतर २ ते ३ चमचे प्री मिक्स घेऊन ते पाण्यात मिसळा. झाकण ठेवून उकळी येईपर्यंत शिजवा, तयार आहे गरमागरम दाल फ्राय. या सोप्या पद्धतीनं बनवलेली दाल फ्राय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

रोज डाळी खाल्ल्यानं पचनतंत्र निरोगी राहण्यास मदत होते. यात भरपूर फायबर्स असतात.  डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत मानली जाते.  डाळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायूंचा त्रासही सहज दूर होतो. डाळींच्या नियमित सेवनाने थकवा आणि आळसही दूर होतो. त्यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते. शरीरातील रक्ताती कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळी खायला हव्यात. याच्या वापराने केस गळण्याची समस्या दूर होते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे थकवा येतो आणि कधीकधी अशक्तपणा येतो. रोज डाळ खाल्ल्याने शरीरात लोहाचा पुरवठा होतो आणि शरीर निरोगी राहते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स