दाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. हा पदार्थ असा आहे की आपण जो पराठा, नान, रोटीसोबत खाऊन शकतो. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. आपण रोजच्या जेवणामध्ये नेहमीची तीच तीच डाळ खाऊन काहीवेळा कंटाळतो. अशावेळी नेमकं चपाती किंवा भातासोबत आपल्याला काहीतरी वेगळं पण चविष्ट खाण्याची इच्छा होते.
जेवणात दाल मखनी म्हणजे शाही मेजवानीच जणू. खरंतर दाल मखनी हा शाजी मेजवानीचाच प्रकार पण या दाल मखनीला आरोग्याचीही एक बाजू आहे. दाल मखनी खाल्ल्याने एक दोन नव्हे तर आरोग्यास अनेक फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ दाल मखनीतील गुणधर्मामुळे ही डाळ आहारात वरचेवर सेवन करण्याचा सल्ला देतात. दाल मखनी पौष्टिक होते ती काळे उडीद, राजमा, मसूर आणि हरभऱ्याच्या डाळींच्या एकत्रित गुणधर्मांमुळे. काहीवेळा आपल्याला रोजच्या जेवणाचा कंटाळा येतो तेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये जातो किंवा घरीच नाही नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो. घरच्या घरी हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या आपण तयार करू शकता. एखादा नवा पदार्थ ट्राय करून पाहण्याची इच्छा असेल तर या डिशची चव नक्की चाखून पाहा(How To Make 'Dal Makhni' at home : Homemade Recipe).
साहित्य :-
१. काळी उडीद डाळ - १ कप २. राजमा - १/४ कप ३. दालचिनी - १ ते २ कांड्या ४. तमालपत्र - २ पाने ५. लवंग - ४ ६. काळी वेलची - २ ७. लवंग - ४ ८. मीठ - चवीनुसार ९. तेल - २ ते ३ टेबलस्पून १०. बटर - १ ते २ टेबलस्पून ११. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)१२. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून १३. हळद - १ टेबलस्पून १४. लाल तिखट मिरची पावडर - १ टेबलस्पून १५. टोमॅटो प्युरी - २ कप १६. गरम मसाला - १ टेबलस्पून १७. धणे पूड - १ टेबलस्पून १८. जिरे पूड - १ टेबलस्पून १९. पाणी - २ कप २०. कसुरी मेथी - १ टेबलस्पून २१. फ्रेश क्रिम - १ टेबलस्पून
नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....
रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...
कृती :-
१. एका कुकरमध्ये काळी उडीद डाळ व राजमा दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी वेलची व पाणी घालूंन शिजवून घ्यावे. २. त्यानंतर एका भांड्यात तेल, बटर घालून मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यावा. हा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. ३. कांदा सोनेरी भाजून झाल्यानंतर त्यात आलं - लसूण पेस्ट घालावी. ४. आता या मिश्रणात हळद, लाल तिखट पावडर, टोमॅटोची प्युरी घालावी. ५. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ घालूंन घ्यावे. ६. दाल मखनीची ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यात गरम मसाला, धणे पूड, जिरे पूड घालावी.
फक्त २ कप रवा आणि १ ग्लास ताक, आप्पे करा मस्त - गुबगुबीत फुललेले...
७. सगळ्यात शेवटी या तयार झालेले दाल मखनीमध्ये कसुरी मेथी, बटर ७. आता या तयार झालेल्या मिश्रणात शिजवून घेतलेली उडीद डाळ व राजमा घालावा. ८. त्यानंतर या मिश्रणात थोडे गरजेनुसार पाणी घालून ही तयार झालेली दाल मखनी १५ ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी. ९. दाल मखनी बनून तयार झाल्यानंतर त्यात चमचाभर कसुरी मेथी, बटर, हिरव्या मिरच्या घालाव्यात. १०. आता गॅस बंद करून सगळ्यात शेवटी या दाल मखनीमध्ये फ्रेश क्रिम घालावी.
गरमागरम दाल मखनी खाण्यासाठी तयार आहे.