Lokmat Sakhi >Food > श्रावणात नैवेद्याला करा खजूर आणि पनीरची खीर, दोन वेगळ्या चवी-पदार्थ खास

श्रावणात नैवेद्याला करा खजूर आणि पनीरची खीर, दोन वेगळ्या चवी-पदार्थ खास

श्रावणात नैवेद्यासाठी खजूर आणि पनीर पासून चविष्ट आणि पौष्टिक खीर तयार करता येतात. या दोन्ही खीर (special sweet dish) उपवासाला देखील चालतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 10:08 AM2022-07-30T10:08:36+5:302022-07-30T10:10:02+5:30

श्रावणात नैवेद्यासाठी खजूर आणि पनीर पासून चविष्ट आणि पौष्टिक खीर तयार करता येतात. या दोन्ही खीर (special sweet dish) उपवासाला देखील चालतात.

How to make dates and paneer kheer | श्रावणात नैवेद्याला करा खजूर आणि पनीरची खीर, दोन वेगळ्या चवी-पदार्थ खास

श्रावणात नैवेद्याला करा खजूर आणि पनीरची खीर, दोन वेगळ्या चवी-पदार्थ खास

Highlightsखजुराची खीर करताना त्यात साखर गरज वाटली तरच घालावी. खजुरामुळे खीरीला चांगला गोडवा येतो. 

श्रावण सुरु झाला की विविध सणवार एकामागोमाग येतात. सणवार म्हटलं की नैवेद्य आलाच. नैवेद्याला वेगळं काय करायचं असा प्रश्न पडतोच. साधारणपणे खीर, शिरा असे पदार्थ नैवेद्याला करता येतात. पण नवीन काही करायचं असेल तर हे पर्याय नकोसे वाटतात आणि दुसरं काही सूचतही नाही. नैवेद्याला खीर करण्याची इच्छा असेल तर तोचतोचपणामुळे हा पर्याय टाळण्याची, बदलण्याची अजिबात गरज नाही. कारण दोन वेगळ्या चवींच्या खीर केल्यास नैवेद्याला खीर असूनही वेगळेपण येईल. खजूर आणि पनीर पासून चविष्ट आणि पौष्टिक खीर तयार करता येतात. या दोन्ही खीर उपवासाला देखील चालतात. 

Image: Google

खजूर खीर

खजुराची खीर करण्यासाठी 15 काळे खजूर ( शक्यतो बिया असलेलेच घ्यावेत) , 2 कप दूध, पाव कप नारळाचं दूध, 1 मोठा चमचा काजू, 1 मोठा चमचा बदाम, 1 मोठा चमचा तूप आणि पाव चमचा वेलची पूड घ्यावी. खजूर खीर करताना अर्धा कप गरम दुधात खजूर अर्धा तास भिजवावेत. खजूर भिजल्यानंतर बिया काढून खजूर दुधात एकजीव करुन त्याची पेस्ट करुन घ्यावी. मोठ्या भांड्यात दूध उकळण्यास ठेवावं. दूध चांगलं उकळलं की गॅसची आच मंद करावी. नंतर दुधात खजुराचं मिश्रण घालावं. दूध 10 मिनिटं मंद आचेवर उकळू द्यावं.  दूध पुन्हा उकळलं की त्यात बारीक कापलेले काजू, बदाम घालावेत. वेलची पूड घालून मिश्रण चांगलं हलवू घ्यावं. नंतर त्यात नारळाचं दूध घालावं. नारळाचं दूध घातल्यानंतर 2 मिनिटांनी गॅस बंद करावा. आवश्यकता वाटली तरच खीरीत आपल्या चवीनुसार साखर घालावी. खजुरामुळे खिरीला चांगला गोडवा येतो. 

Image: Google

पनीर खीर

पनीरचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. पण पनीरची खीर ही अनेकांसाठी नवीन आहे. पनीर खीर चविष्ट तर लागतेच शिवाय ती पौष्टिकही असते.  पनीर खीर तयार करण्यासाठी 1 कप किसलेलं पनीर, 4 कप दूध, 7-8 चमचे साखर, वेलची पुड, 2 मोठे चमचे बदाम, 2 मोठे चमचे काजू आणि चिमूटभर केशर घ्यावं. 

पनीर खीर करताना सर्वात आधी मोठ्या भांड्यात दूध गरम करायला ठेवावं. मध्यम आचेवर दूध उकळू द्यावं. दूध उकळलं की डावाच्या चमच्यानं ते सारखं हलवत राहावं. दुधाला दाटसरपणा आला की आणखी 5-7 मिनिटं दूध उकळावं. दूध उकळताना ते सारखं हलवावं. नंतर दुधात साखर घालावी. साखर घातल्यानंतर दूध आणखी 5 मिनिटं उकळू द्यावं. नंतर दुधात काजू, बदामाचे काप घालावेत. ते दुधात नीट मिसळले की मग दुधात किसलेलं पनीर घालावं. पनीर घातल्यानंतर थोडा वेळ दूध उकळू द्यावं. यातलं पनीर नीट शिजलं की गॅस बंद करावा. खिरीमध्ये वेलची पूड घालावी. ही खीर गरम  किंवा गार दोन्ही पध्दतीनं छान लागते. पनीरमुळे खीर छान दाटसर होते. 

Web Title: How to make dates and paneer kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.