Lokmat Sakhi >Food > रवा न वापरता करा चविष्ट अरिसी उपमा! ग्लूटन फ्री पदार्थांचा खास पर्याय, चव आणि पोषण भरपूर

रवा न वापरता करा चविष्ट अरिसी उपमा! ग्लूटन फ्री पदार्थांचा खास पर्याय, चव आणि पोषण भरपूर

इडली रवा वापरुन करण्याचा खास दक्षिणी पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 05:43 PM2022-10-12T17:43:27+5:302022-10-12T17:45:04+5:30

इडली रवा वापरुन करण्याचा खास दक्षिणी पदार्थ

How to Make delicious arisi upma? A unique gluten free recipe, rich in flavor and nutrition | रवा न वापरता करा चविष्ट अरिसी उपमा! ग्लूटन फ्री पदार्थांचा खास पर्याय, चव आणि पोषण भरपूर

रवा न वापरता करा चविष्ट अरिसी उपमा! ग्लूटन फ्री पदार्थांचा खास पर्याय, चव आणि पोषण भरपूर

Highlightsडाळींचे प्रमाण वाढवले तर प्रोटीनफुल ‌आसट खिचडी होऊ शकते.

उपमा हा पदार्थ तसा काही नवीन नाही. सांजा, उपमा नााश्त्याला केला जातोच. अगदी घरोघरी ते लग्नकार्यातही. त्यातही दोन टोकं काहींना उपमा आवडतो, काहींना अजिबात आवडत नाही. मात्र तरीही एक प्रश्न उरतोच की रोज उठून नाश्त्याला काय करायचं? डब्यात काय द्यायचं? नवीन आणि चविष्ट, पोटभरीचं आणि पौष्टिक हे सारं कसं जमवायचं?
दक्षिण भारतातील एक तुलनेने कमी प्रसिद्ध असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे अरिसी उपमा. हा उपमा वेगळा आहेच, पण यात आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो, प्रमाण बदलू शकतो. रात्री वन डिश मिल म्हणूनही हा पदार्थ करता येईल. याशिवाय कुणाला ग्लूटन ॲलर्जी असेल तर हा पदार्थ उत्तम.  त्या करायला सोपा,पचायला हलका आणि चविष्ट. यातली गंमत म्हणजे नाव उपमा असलं तरी त्यात आपला नेहमीचा उपमा वापरायचा नाही.

(Image : google)

अरिसी उपमा

१ वाटी इडली रवा. मटर,तोंडली,,गाजर,वांगी,फरसबी,काजू यापैकी सर्व किंवा अन्य तुम्हाला आवडतील त्या भाज्या. भाज्या बारीक चिरुन घ्यायच्या.
तूप,राई, हिंग,कढीलिंब, उडीद आणि चणा डाळ,मीठ, ओले खोबरे, दही १ चमचा.
यातले डाळींचे प्रमाण वाढवले तर प्रोटीनफुल ‌आसट खिचडी होऊ शकते. उपमा करायचा असेल तर रवा आणि डाळी अर्धी अर्धी वाटी हवा.  
पाणी दोन वाट्या
कृती
प्रथम इडली रवा कोरडा लालसर भाजून घ्यावा. डाळी धुवून घ्या. 
फोडणी करुन त्यात सर्व भाज्या घाला. मग बाकी साहित्य घाला, त्यानंतर इडली रवा +डाळ घाला.
व्यवस्थित परतून त्यात इडली रव्याच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ घालून मंद गॅसवर एक वाफ काढा. कुकरमध्ये एक शिट्टी करा.
नारळ वरुन घाला. उपम्यातही काहीजण घालतात.
उत्कृष्ट उपमा तयार होतो. पोटभरीचा.
 

Web Title: How to Make delicious arisi upma? A unique gluten free recipe, rich in flavor and nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न