Lokmat Sakhi >Food > पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...

पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...

Crispy Matar Karanji Recipe : How To Make Matar Karanji At Home : How to Make Green Peas Karanji : How to Make Delicious Matar Karanji : हिवाळ्यात वारंवार भूक लागल्यावर खाता येईल अशी दीर्घकाळ टिकणारी खुसखुशीत मटार करंजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 15:17 IST2024-12-17T15:16:28+5:302024-12-17T15:17:27+5:30

Crispy Matar Karanji Recipe : How To Make Matar Karanji At Home : How to Make Green Peas Karanji : How to Make Delicious Matar Karanji : हिवाळ्यात वारंवार भूक लागल्यावर खाता येईल अशी दीर्घकाळ टिकणारी खुसखुशीत मटार करंजी...

How to Make Delicious Matar Karanji Crispy Matar Karanji Recipe How To Make Matar Karanji At Home How to Make Green Peas Karanji | पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...

पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...

हिवाळा ऋतू म्हटलं की या सिझनमध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या अगदी फ्रेश आणि ताज्या मिळतात. या ऋतूंत बाजरात विकायला ठेवलेल्या भाज्यांचा फ्रेश हिरवागार रंग बघून त्या लगेच विकत घ्यावी अशी इच्छा (Crispy Matar Karanji Recipe) होतेच. हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये हिरवागार मटार (How To Make Matar Karanji At Home) हा सर्वात जास्त विकला जातो. बाजारात मटार (How to Make Delicious Matar Karanji) दिसायला लागले की आपल्याला मटारचे काय काय पदार्थ करु असे होऊन जाते. मटार भात, पावभाजी, मटार उसळ, मटार कटलेट हे सगळे आपण नेहमीच करतो. परंतु हिवाळ्यात हे मटार वापरुन त्यापासून चमचमीत, खुसखुशीत अशा मटार करंजी करण्याचा बेत प्रत्येक घरात एकदा तरी होतोच(How to Make Green Peas Karanji).

अतिशय चविष्ट अशी ही मटार करंजी करायला सोपी असून चवीलाही अतिशय छान लागते. यासाठी फारसा वेळ लागत नसून अगदी कमीत कमी पदार्थांमध्ये झटपट होणारी ही रेसिपी थंडीच्या दिवसांत खायला फार मस्त लागते. सकाळच्या नाश्त्याला, ४ वाजताच्या चहासोबत किंवा अगदी जेवणातही साईड डीश म्हणून आपण हा पदार्थ नक्की करु शकतो. विकतचे तळलेले सामोसे, वडे खाण्यापेक्षा घरीच असा चविष्ट पदार्थ केला तर बाहेर काहीतरी चमचमीत खावे अशी इच्छाही होणार नाही आणि लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळेच हा पदार्थ खाऊन मनोमन खूश होतील. पाहूया मटार करंजी करण्याची सोपी रेसिपी. 

साहित्य :- 

१. मटार - दिड कप मटार 
२. बटाटा - १/२ कप 
३. मैदा - २ कप 
४. मीठ - चवीनुसार 
५. साजूक तूप - पाव कप 
६. पाणी - गरजेनुसार 
७. आलं - दिड इंच 
८. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या 
९. खोबऱ्याचे तुकडे - १/२ कप 
१०. तेल - ४ ते ५ टेबलस्पून 
११. हिंग - १/२ टेबलस्पून 
१२. जिरेपूड - १/२ टेबलस्पून 
१३. धणेपूड - १/२ टेबलस्पून 
१४. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून 
१५. कोथिंबीर - २ टेबसलस्पून (बारीक चिरलेली)
१६. गव्हाचे पीठ - २ कप 

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...


‘नो ब्रेड मटार टोस्ट सँडविच‘- हिवाळ्यात नाश्त्याला करा मटारचा हा पदार्थ, मुलं म्हणतील रोज कर...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी चपातीसाठी जसे कणीक मळतो तसे कणीक मळून घ्यावे. कणीक मळताना त्यात चवीनुसार मीठ, साजूक तूप आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. कणीक मळून १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्यावे. 
२. आता एका भांड्यात हिरवे मटार आणि बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे घेऊन ते कुकरला लावून शिजवून घ्यावे. 
३. उकडवून घेतलेले मटार आणि बटाटे मिक्सरला हलकेच फिरवून थोडे जाडसर भरड होईल असे सारण वाटून घ्यावे. 

जान्हवी कपूरला 'या' महाराष्ट्रीयन गावरान पदार्थाची पडली भुरळ, हिवाळ्यात खायलाच हवा असा झणझणीत पदार्थ...

४. आता मिक्सरच्या एका भांड्यात आलं, हिरव्या मिरच्या, नारळाचे तुकडे घालून हिरव्या रंगाचे वाटण तयार करुन घ्यावे. 
५. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात हिंग, मिक्सरला वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचे वाटण, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर, उकडवून घेतलेलं हिरवे मटार आणि बटाट्याचे सारण घालावे, वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालावे. आता ४ ते ५ मिनिटे हे सारण हलकेच परतवून शिजवून घ्यावे. 
६. कणकेचे लहान गोळे करुन त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यामध्ये हे तयार मटारचे सारण भरुन आपण करंजीला दुमडतो तसे दुमडून फिरकीने कडा कापून घ्याव्यात.
७. कढईत तेल घालून मध्यम आचेवर करंज्या तळून घ्याव्यात. 

 या गरमागरम मटार करंज्या चिंचेची चटणी, सॉस किंवा नुसत्याही खायला अतिशय छान लागतात.

Web Title: How to Make Delicious Matar Karanji Crispy Matar Karanji Recipe How To Make Matar Karanji At Home How to Make Green Peas Karanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.