Lokmat Sakhi >Food > वाडगाभर सायीचे १५ मिनिटात करा रवाळ साजूक तूप, विकतपेक्षा घरी तयार केलेले तूप चांगले..

वाडगाभर सायीचे १५ मिनिटात करा रवाळ साजूक तूप, विकतपेक्षा घरी तयार केलेले तूप चांगले..

How to make Desi Ghee from Malai at home : रवाळ दाणेदार तूप करण्याची सोपी कृती, भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरी तयार करा, वेळखाऊ काम होईल चटकन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 11:41 AM2023-12-17T11:41:20+5:302023-12-18T15:35:10+5:30

How to make Desi Ghee from Malai at home : रवाळ दाणेदार तूप करण्याची सोपी कृती, भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरी तयार करा, वेळखाऊ काम होईल चटकन..

How to make Desi Ghee from Malai at home | वाडगाभर सायीचे १५ मिनिटात करा रवाळ साजूक तूप, विकतपेक्षा घरी तयार केलेले तूप चांगले..

वाडगाभर सायीचे १५ मिनिटात करा रवाळ साजूक तूप, विकतपेक्षा घरी तयार केलेले तूप चांगले..

काही जण रोजच्या स्वयंपाकात तुपाचा (Homemade Ghee) वापर करतात. उत्तम आरोग्यासाठी तूप हवेच. अनेक जण तेलाऐवजी तुपाचा आहारात समावेश करतात. मार्केटमध्ये वेगवगेळ्या ब्रॅण्डसचे तूप, तेलाचे डबे उपलब्ध आहेत. पण भेसळयुक्त तूप न खाता आपण घरगुती तूप तयार करून खाऊ शकता. तुपामध्ये (Benefits of Ghee) व्हिटामिन ए, डी, कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. जे फक्त आरोग्यासाठी नसून, स्किन आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते.

पण अनेकांना तूप तयार करणे हे किचकट काम वाटते. तूप तयार करण्यात खूप वेळ जातो, असे काही गृहिणींचे म्हणणे आहे (Cooking Tips). जर आपल्याला कमी वेळात तूप घरात तयार करायचे असेल तर, ही ट्रिक नक्कीच वापरून पाहा. या ट्रिकमुळे काही मिनिटात साजूक रवाळ तूप घरच्या घरी तयार होईल(How to make Desi Ghee from Malai at home).

साजूक रवाळ तूप करण्यासाठी लागणारं साहित्य (How to Make Ghee at Home)

एक मोठा बाऊल सायी

पाणी

तेलाचा एकही थेंब न वापरता करा पोह्याचे मेदू वडे, हेल्दी पण चमचमीत रेसिपी-वेटलॉससाठीही खूप उपयोगी

वेलची

कृती

सर्वप्रथम, फ्रीजमध्ये साठवून ठेवलेली साय बाहेर काढून ठेवा. दुधाची साय थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून ठेवा. नंतर त्यात २ ग्लास पाणी घालून इलेक्ट्रिक बिटरने फेटून घ्या. फेटून घेतल्यानंतर त्यावर लोणी तयार होईल. तयार लोणी हाताने अलगद उचलून गोळा तयार करा, व लोण्याचा गोळा एका भांड्यात काढून ठेवा. गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात लोण्याचा गोळा घालून, गॅस मध्यम आचेवर ठेवा. काही वेळानंतर आपण पाहू शकता, त्यातून तूप सुटू लागेल.

वाफाळलेल्या भाज्या खाऊन कंटाळलात? खाऊन पाहा चटकदार वेट लॉस चाट, वजन होईल कमी-पोटही होईल सपाट

सायीचा रंग बदलून ब्राऊन होईपर्यंत शिजू द्या. नंतर गॅस बंद करा. आपण त्यात वेलची देखील घालू शकता. जेणेकरून तुपातून उत्तम सुगंध येईल, शिवाय त्यावर बुरशीही तयार होणार नाही. तूप तयार झाल्यानंतर चहाच्या गाळणीने गाळून तूप वेगळे करा. तयार तूप एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशाप्रकारे १५ मिनिटात घरच्या घरी रवाळ तूप तयार होईल.

Web Title: How to make Desi Ghee from Malai at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.