जेवणाआधी किंवा जेवताना काहीतरी नवीन खाण्याची इच्छा नेहमीच होते. अशावेळी घरच्याघरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही चवदार, खमंग पदार्थ बनवू शकता. जास्तवेळ न लावता अगदी कमीत कमी वेळात हे पदार्थ तयार होतील. (Chana Koliwada Recipe) रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर चना कोळीवाडा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. काबुली चण्यांपसून बनवला जाणारा हा पदार्थ चवीला खमंग, चटपटीत लागतो. काबुली चण्यांची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही छोल्यांची भाजी विसरून जाल. (Dhaba Style Crispy Chana Koliwada Recipe)
ढाबास्टाईल चणा कोळीवाडा बनण्यासाठी सगळ्यात आधी काबूली चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. सकाळी उठल्यानंतर कुकरमध्ये हे चणे शिजवण्यासाठी ठेवा. शिजवताना मीठ घालायला विसरू नका. एका भांड्यात एक अंडं घ्या, अंड्याऐवजी तुम्ही कॉर्न फ्लोअर किंवा तांदळाच्या पिठाची पेस्टही वापरू शकता.
कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, गरम मसाला, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस,आवडीनुसार रेड फूड कलर, मीठ घाला. हे मिश्रण एकत्र करून पेस्ट बनवा. यात शिजवलेले चणे घोळवून लालसर होईपर्यंत तळून घ्या नंतर लसूण अर्धवट फोडून तळून घ्या आणि तळलेल्या चण्यांवर घाला तयार आहे गरमागरम ढाबास्टाईल कुरकुरीत चणा कोळीवाडा.
जर तुम्ही रात्री छोले भिजवायला विसरलात तर सगळ्यात आधी २ वाटी छोले कुकरमध्ये घालून २ ग्लास पाणी घाला. चणे उकळण्यासाठी कुकर गॅसवर ठेवा आणि 2 शिट्ट्या येईपर्यंत उकळवा. आता गॅस बंद करा आणि वाफ थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडून पाणी वेगळे करा.
पोहे बनवल्यानंतर लगेच कडक होतात तर कधी गचगचीत? ५ टिप्स, परफेक्ट- मोकळे बनतील पोहे
पाण्यातून बाहेर काढलेले चणे पुन्हा कुकरमध्ये ठेवा आणि त्यात 2 ग्लास थंड पाणी घाला आणि 4-5 बर्फाचे तुकडे घाला. कुकरचे झाकण बंद करा आणि त्यांना ५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. कुकरची वाफ पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर कुकर उघडा आणि चणे तपासा. या टिप्सनी चणे लवकर शिजण्यास मदत होईल.