Join us  

अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल- मखनी करा घरीच, ही बघा एक चवदार रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 3:01 PM

Food And Recipe: उत्तम चवीची आणि अस्सल पंजाबी स्टाईल दाल मखनी करायची असेल, तर ही खास रेसिपी (dal makhani recipe) एकदा बघाच..

ठळक मुद्देआपण दाल मखनी करायला जातो आणि तिच्यात काहीतरी उणीव राहून जाते. त्यामुळे तिला जो ढाबा स्टाईल पंजाबी चवीचा खास फ्लेवर हवा असतो, तो येत नाही.

सध्या थंडीच्या दिवसांत तर रात्रीच्या जेवणात गरमागरम दाल- मखनी आणि वाफाळता भात असा बेत व्हायलाच हवा. रविवारी किंवा एखाद्या सुटीच्या दिवशी करण्यासाठीही हा मेन्यू एकदम हीट आहे. पण बऱ्याचदा आपण दाल मखनी करायला जातो आणि तिच्यात काहीतरी उणीव राहून जाते. त्यामुळे तिला जो ढाबा स्टाईल पंजाबी चवीचा खास फ्लेवर हवा असतो, तो येत नाही. म्हणूनच ही रेसिपी (dal makhani recipe) एकदा पाहून घ्या आणि अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल मखनी (dhaba style dal makhani with special Punjabi tadka) आता घरीच करून पहा... अशी चवदार होईल की खाणारे सगळेच म्हणतील दिल खुश हुआ... 

दाल मखनी रेसिपी साहित्य५०० ग्रॅम काळी उडीद डाळ

५० ग्रॅम राजमा

२ टेबलस्पून क्रिम किंवा लोणी

२ टेबलस्पून तूप

फळं- भाज्या जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी ५ टिप्स, बघा प्रत्येक फळ- भाजी साठवून ठेवण्याची खास पद्धत

२५० ग्रॅम दूध

४ टोमॅटो

२ कांदे

 

४ हिरव्या मिरच्या

आलं- लसूण पेस्ट १ चमचा

१ चिमूटभर खाण्याचा सोडा, तेवढाच हिंग

१ टीस्पून हळद

चवीनुसार तिखट आणि मीठ

अर्धा टीस्पून जीरे, मेथी दाणे, दालचिनी आणि तेजपान.

 

कृती१. सगळ्यात आधी उडीद डाळ आणि राजमा ८ ते ९ तास पाण्यात भिजत ठेवा.

२. त्यानंतर शिजविण्यासाठी कुकरमध्ये टाका. त्यात थोडं मीठ, सोडा टाका आणि मध्यम आचेवर शिजवून घ्या. २ ते ३ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.

झुरळांना घराबाहेर काढण्याचा मस्त सुगंधित उपाय, उदबत्तीचा करा खास वापर, बघा १ स्मार्ट ट्रिक

३. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात तूप टाका. तूप गरम झाल्यानंतर दालचिनी, तेजपान आणि मेथी दाणे टाकून परतून घ्या. 

 

४. आता त्यात कांद्याची पेस्ट टाकून चांगली परतून घ्या. कांदा परतून झाला की आलं- लसूण पेस्ट टाका. त्यानंतर टोमॅटो प्यूरी टाकून ती ही तिचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगली परतून घ्या. 

"व्यायामाला पर्याय नाही...", असं म्हणत शिल्पा शेट्टी करतेय बर्ड- डॉग व्यायाम, बघा कसा करायचा- काय त्याचे फायदे 

५. टोमॅटो प्यूरी परतून झाली की त्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. हे सगळं मिश्रण हलवून एकजीव झालं की त्यात क्रिम किंवा लोणी घाला. या मिश्रणात आता शिजवलेली डाळ आणि राजमा टाका. दूध घालून दाल मखनी हवी तेवढी पातळ किंवा घट्ट करा. कढईवर झाकण न ठेवता अर्धा ते पाऊण तास मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवा आणि सगळ्या पदार्थांचे फ्लेवर एकदा सेट होऊ द्या. अर्ध्या तासाने गरमागरम दाल मखनी सर्व्ह करा.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.