Lokmat Sakhi >Food > ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ

ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ

How to Make Dhaba Style Dal Palak (Dal palak kashi karaychi) : साधं वरण खाण्यापेक्षा डाळ-पालक केली तर जेवणाची रंग वाढेल आणि  तोंडालाही चव येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:38 AM2023-12-06T09:38:00+5:302023-12-06T14:09:48+5:30

How to Make Dhaba Style Dal Palak (Dal palak kashi karaychi) : साधं वरण खाण्यापेक्षा डाळ-पालक केली तर जेवणाची रंग वाढेल आणि  तोंडालाही चव येईल.

How to Make Dhaba Style Dal Palak : Easy Dal Palak Recipe Best Dal Palak Recipe in Marathi | ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ

ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ

थंडीच्या (Winter Special Recipes) दिवसात बाजारात ताज्या भाज्या मिळतात. पालेभाज्या खायला लहान मुलं नाटकं करतात किंवा अनेकदा मोठ्यांनाही पालेभाज्या खाणं नको वाटतं. मेथी, पालक, शेपू, चवळी अशा या पालेभाज्या तुम्ही नेहमीच खात असाल. (Dal Palak Recipe Restaurant Style) याचाच वापर करून तुम्ही भजी, पराठा बनवू शकता किंवा साधा वरण भात केला तरी वरणात या भाज्यांचा समावेश करू शकता. डाळ पालक करण्याची सोपी  रेसिपी पाहूया. (Dal Palak Recipe) साधं वरण खाण्यापेक्षा डाळ-पालक केली तर जेवणाची रंग वाढेल आणि  तोंडालाही चव येईल. (Dal Palak Recipe in Marathi)

डाळ-पालक करण्याची सोपी रेसिपी (Dal Pakal Kashi Karaychi in Marathi)

१) डाळ पालक करण्यासाठी सगळ्यात आधी मुगाची डाळ २ ते ३ वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. साध्या पाण्यात डाळ धुवून घ्या त्यानंतर गरम पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी भिजवून ठेवा. डाळ लवकर शिजावी यासाठी भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा.

२) पालकाचे देठ काढून पानं एका भांड्यात काढून घ्या. डाळ पालक बनवताना तुम्ही देठ वेगळे केले नाही तर त्याची चव व्यवस्थित लागणार नाही. म्हणूनच फक्त पालकाच्या पानांचाच वापर करा. पालक स्वच्छ धुवून घ्या.

३) प्रेशर कुकरमध्ये १ कप डाळीसाठी ३ कप पाणी आणि पाव टिस्पून हळद आणि मीठ घालून झाकण बंद करा. हाय फ्लेमवर एक शिट्टी घेऊन नंतर गॅस कमी करून पुन्हा २ शिट्या  घ्या. नंतर गॅस बंद करून प्रेशर कुकर थंड होऊ द्या. 

४) मसाले बनवण्यासाठी एक १ कांदा, २ टोमॅटो,  २ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं ७ ते ८ लसूण घ्या.  कांदा बारीक चिरून घ्या. पालक चिरून घ्या.  

विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

५) एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे काप, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर कुकर उघडून डाळीचे टेक्स्चर तपासा. डाळ शिजली असेल तर पुढील प्रक्रियेला सुरूवात करा.

६) कढईत २ चमचे साजूक तूप घाला.  तूप गरम झाल्यानंतर त्यानंतर १ चमचा जीरं आणि  अर्धा टिस्पून हिंग घाला. चिरलेला कांदा घालून परतून घ्या.  कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात तयार टोमॅटो-आलं लसणची पेस्ट घाला. त्यात तुम्ही आवडीनुसार मसाले घालू शकता. ५ मिनिटं परतवून घेतल्यानंतर त्यात पालक घाला.

रेस्टाँरंटस्टाईल कढी पकोड्यांची सोपी रेसिपी; थंडीत झटपट करा गरमागरम कढी-पकोड्यांचा बेत

७)  पालकातील पाणी पूर्णपणे कमी होईपर्यंत शिजवून घ्या. पालक मसाल्यात एकजीव झाल्यानंतर त्यात शिजवलेली डाळ घाला. त्यात गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्या. ५ मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या त्यानंतर डाळ पूर्णपणे शिजलेली दिसेल. गॅस बंद करून एका भांड्यात काढून घ्या. 

८) एका फोडणीच्या भांड्यात तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात जीरं, मिरची, कढीपत्ता आणि हिंग घाला. तयार फोडणी डाळीच्या भांड्यात घाला. तयार आहे चवदार डाळ पालक.

Web Title: How to Make Dhaba Style Dal Palak : Easy Dal Palak Recipe Best Dal Palak Recipe in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.