Join us

घरीच करा ढाबास्टाईल लसूणी मेथी, चव अशी भारी की सगळेच विचारतील ही खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2023 16:35 IST

How To Make Dhaba Style Lasuni Methi At Home: अतिशय सोप्या पद्धतीने घरच्याघरी ढाबास्टाईल लसूणी मेथी कशी करायची, याची ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या...(Lasooni methi recipe)

ठळक मुद्देअगदी ढाबास्टाईल लसूणी मेथी घरी कशी करायची ते पाहा

सध्या बाजारात हिरवीगार कोवळी मेथीची भाजी भरपूर प्रमाणात मिळते आहे. मेथीची डाळ किंवा कूट घालून भाजी बऱ्याच घरांमध्ये नेहमीच केली जाते. बऱ्याचदा आपण मेथीचे पराठे देखील करतो. तर कधी कधी मेथी घालून केलेलं डाळ- मेथी हा वरणाचा प्रकारही होतो. आता अगदी ढाबास्टाईल लसूणी मेथी घरी कशी करायची ते पाहा (Simple cooking tips for making perfect restaurant style lasunu methi). ही रेसिपी अगदी सोपी आहे. या रेसिपीनुसार केलेली लसूणी मेथी घरात नक्कीच सगळ्यांना आवडेल.  (Lasooni methi recipe)

 

लसूणी मेथी करण्याची रेसिपी

साहित्य

मेथीची भाजी २ वाट्या

१० ते १२ लसूण पाकळ्या

हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

खोबरे, शेंगदाणे आणि डाळवं असे सगळे मिळून अर्धी वाटी

गरम मसाला, लाल तिखट प्रत्येकी एकेक टीस्पून किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त

१ टीस्पून आलं लसूण पेस्ट

 

१ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट

१ मोठ्या आकाराचा कांदा

१ माेठ्या आकाराचा टोमॅटो

नवरीने लग्नात घातला चक्क डेनिमचा लेहेंगा तर नवरदेवाने डेनिम कुर्ता- बघा ही भलतीच फॅशन

१ ते दिड टेबलस्पून तेल

चवीुनसार मीठ

२ ते ३ वाळलेल्या लाल मिरच्या

कृती

१. सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल टाकून अख्ख्या लसूण पाकळ्या परतून घ्या. नंतर त्यात मेथीची भाजी टाकून ती थोडंसं मीठ टाकून वाफवून घ्या.

२. यानंतर खोबरे, शेंगदाणे, डाळवं भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्याचा एकत्रित कुट करून घ्या. 

 

३. गॅसवर एक कढई तापायला ठेवा. त्यात फोडणी करून घ्या. फोडणी झाली की त्यात कांद्याची प्युरी आणि आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. यानंतर त्यात टोमॅटोची प्यूरी टाका.

रोजच्या वापरासाठी चहाचे कप घ्यायचे? बघा ३ पर्याय- कमी किमतीत सुंदर खरेदी 

४. कांदा- टोमॅटोचा कच्चा वास गेला आणि ती प्युरी कढई सोडू लागली की मग त्यात गरम मसाला, लाल तिखट, मिरचीची पेस्ट आणि खोबरे- शेंगदाणे, डाळवं यांचा कूट टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं आणि त्यातून तेल सुटू लागलं की त्यात आपण आधी वाफवून घेतलेली मेथी टाका.

५. थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून वाफ काढून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि पुन्हा वरून लाल मिरच्या आणि लसणाची फोडणी घाला. ढाबास्टाईल अतिशय चवदार अशी लसूणी मेथी झाली तयार... 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती