Join us  

ढाबास्टाईल शेवगा मसाला करण्याची झणझणीत रेसिपी- चव इतकी भारी की सगळेच मारतील ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 3:22 PM

How to make dhaba style shevga masala at home: ढाब्यावर मिळते तशी अस्सल गावरान चवीची शेवगा मसाला भाजी घरी करायची असेल तर लगेचच ही रेसिपी पाहून घ्या....

ठळक मुद्दे भाजी इतकी चवदार होईल की घरातले सगळेच तिच्यावर ताव मारतील.

शेवगा मसाला ही भाजी जर जेवणात असेल तर जेवणारे हमखास एखादी पोळी जास्तीच खातात. काही विशेष बेत करायचा असेल तर शाकाहारी कुटूंबात शेवगा मसाला करण्यास प्राधान्य दिलं जातं. कितीही झटून भाजी केली तरी घरच्या भाजीला विकतसारखी चव नाही, अशी घरातल्या मंडळींची तक्रार असते. त्यांची ही तक्रार दूर करण्यासाठी आणि खाली दिलेल्या रेसिपीने शेवगा मसाला करून पाहा (shevga handi recipe). भाजी इतकी चवदार होईल की घरातले सगळेच तिच्यावर ताव मारतील. (How to make dhaba style shevga masala at home)

शेवगा मसाला करण्याची रेसिपी

 

शेवग्याच्या शेंगांचे ६ ते ७ काप

१ कांदा

१ टोमॅटो

१ टेबलस्पून आलं- लसूण पेस्ट

खोबऱ्याचा तुकडा

नॉनस्टिक तव्याचे कोपरे खूप चिकट- तेलकट झाले? १ सोपा उपाय- न घासता तवा होईल चकाचक

१ टीस्पून धने, जीरे आणि बडिशेप

१ टेबलस्पून तांदूळ आणि हरबरा डाळ

२ वेलची, २ लवंगा, ४ ते ५ काळे मीरे

दालचिनीचा एक छोटासा तुकडा

चवीनुसार मीठ आणि लाल तिखट

१ टेबलस्पून कसूरी मेथी

 

कृती

सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगाचे काप करा आणि ते पाण्यात टाकून त्यात थोडं मीठ घालून उकळायला ठेवा.

जेनिफर विंगेट सांगते- बस्सं... मुझसे इतनाही हो पायेगा, असं म्हणायला शिकलं पाहिजे, कारण...

यानंतर भाजीसाठी गरम मसाला तयार करून घ्या. त्यासाठी खोबऱ्याचा किस करून थोडा भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये धने, जिरे, बडिशेप, तांदूळ, हरबरा डाळ, वेलची, लवंग, दालचिनी, मीरे टाकून भाजून घ्या. 

हे सगळे भाजून घेतलेले पदार्थ थंड झाले की मिक्सरमधून फिरवून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या.

 

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाकून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर थोडी हळद घाला आणि कांद्याची प्युरी तसेच आलं- लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. आलं- लसूण- कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून झालं की त्यात टोमॅटोची प्यूरी टाका.

द्राक्षं, स्ट्राॅबेरी खाल्ल्यानंतर घसा खवखवतो? बघा डॉक्टरांनी सांगितलेलं त्यामागचं कारण आणि उपाय

टाेमॅटोचा कच्चा वास जाऊन जेव्हा ग्रेव्हीचं कढईला चिकटणं बंद होईल तेव्हा त्यात आपण तयार केलेला गरम मसाला टाका. गरम मसाला थोडा परतून घेतला की त्यात शेंगा परतून घेतलेलं पाणी आणि उकडलेल्या शेंगा असं दोन्ही घाला.

भाजीमध्ये आणि चवीनुसार तिखट, मीठ घाला. सगळ्यात शेवटी कसूरी मेथी घालून एक- दोन उकळ्या येऊ द्या. यानंतर गॅस बंद करा. भाजीमध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि झाकण ठेवून भाजीतले मसाले सेट होऊ द्या. हॉटेलसारखी चमचमीत शेवगा मसाला झाली तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.