घरी नाश्ता बनवायचं म्हणलं की झटपट होणारा कोणता पदार्थ अगदी सहज बनवता येईल हे सुचत नाही. वेळेअभावी बरेच लोक फक्त चहा बिस्कीट्स किंवा चहा चपाती खाऊन घराबाहेर पडतात. (How to make Dhokla Fluffy) पोहे, उपमा हे पदार्थ नाश्त्याला अगदी कमीत कमी वेळात बनवून होतात पण वेगळा पदार्थ नाश्त्याला बनवायचा तर खूप वेळ जाणार असं वाटतं. मार्केटसारखे मऊ, जाळीदार ढोकळे तुम्ही घरीच अगदी कमीत कमी वेळात बनवू शकता. ढोकळा बनवण्याची परफेफ्ट पद्धत पाहूया. (How to make dhokla)
ताकातला ढोकळा कसा बनवायचा?
ताकातला ढोकळा करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप बेसनाच्या पीठात १ कप आंबट ताक मिसळून पेस्ट तयार करून घ्या. (Buttermilk Dhokla) ९ ते १० तास हे पीठ आंबवण्यासाठी झाकण लावून ठेवा. पीठ आंबवून झाल्यानंतर झाकण काढा आणि पीठाला जाळी आली आहे की नाही ते पाहा. त्यानंतर या मिश्रणात १ कप रवा, १ चमचा मीठ,१ टिस्पून साखर घाला. (Khaman Dhokla Recipe Market-style Soft and Spongy)
मिक्सरच्या भांड्यात धणे, आलं, मिरची घालून बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट ढोकळ्याच्या पिठात घाला नंतर १ टिस्पून तेल घाला. मिश्रण एकजीव करून त्यात १ चमचा खाण्याचा सोडा घाला. ढोकळा बनवण्याच्या भांड्यााला तेलानं ग्रीस करा आणि त्यात हे पीठ घाला आणि भांडं २ ते ३ वेळा हळूवार वर खाली हलवून घ्या. जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत.
२० मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवून घ्या. २० मिनिटानंतर ढोकळ्याचं भांडं बाहेर काढून चौकोनी काप सुरीच्या साहाय्यानं करून घ्या. मोहोरी, मिरची, कढीपत्त्याच्या फोडणीसह साखरेचं पाणी ढोकळ्यांवर घाला. तयार आहेत गरमागरम ढोकळे. ताकातले ढोकळे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता.
१) ढोकळा बनवण्यासाठी बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला बाऊल आणि चाळणीची आवश्यकता असेल.
२) ढोकळा मऊ होण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणे फार महत्वाचे आहे. मिश्रण एका दिशेने हळूहळू ढवळत असताना पाणी घाला. मिश्रण हातानेही फेटू शकता.
3) हळदीच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवा. हळद जास्त घातल्यानं ढोकळा काळपट होऊ शकतो म्हणून योग्य प्रमाणात हळद घाला.