पिवळा धम्मक, मऊ, जाळीदार, लुसलुशीत ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाणे याहून मोठे सुख नाही. ढोकळा हा असा पदार्थ आहे की जो सगळ्यांनाच अतिशय आवडतो. ढोकळा चवीला जितका सुंदर लागतो तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मजा येते. ढोकळा हा एक असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. ढोकळा हा प्रामुख्याने गुजरात प्रांतांतील एक मुख्य पदार्थ आहे. परंतु आता हा गुजराती खमण ढोकळा आजकाल सहजपणे कोणत्याही दुकानात खाण्यासाठी सहज मिळतो. सध्या कोणत्याही सण, समारंभ, पार्टीमध्ये किंवा जेवणाच्या थाळीत साईड डिश म्हणून ढोकळा हा प्रकार असतोच. ढोकळा जितका फुलून मऊ, जाळीदार होतो तितकाच तो दिसायला आणि खायला अतिशय सुंदर लागतो.
हा ढोकळा आपण काहीवेळा बाजारांतून विकत आणतो किंवा काही गृहिणी घरी देखील ढोकळा बनवतात. जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार झाला तरच तो खाण्यात मजा येते. परंतु काहीवेळा ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. अशावेळी ढोकळा मनासारखा न फुलता फसला तर हिरमोड होतो, आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी फेरल्यासारखे होते. त्यामुळे ढोकळा बनवताना तो साचांगला फुलून यावा यासाठी आपण करत असलेल्या नेहमीच्या चुका टाळून ढोकळा कसा मऊ व जाळीदार बनवता येईल, ते पाहूयात(How To Make Dhokla Spongy And Fluffy At Home).
साहित्य :-
१. पिठीसाखर - ३ टेबलस्पून २. तेल - ३ टेबलस्पून ३. लिंबूसत्व - दिड टेबलस्पून ४. हिंग - २ ते ३ टेबलस्पून५. हळद - २ चिमूटभर ६. पाणी - ३ टेबलस्पून ७. बेसन - दिड कप८. खाण्याचा सोडा - १ टेबलस्पून९. मीठ - चवीनुसार
फोडणीसाठी...
१०. तेल - ३ टेबलस्पून ११. मोहरी - १ टेबलस्पून१२. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ १३. कडीपत्ता - ८ ते १० पाने१४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून १५. पाणी - १ कप १६. मीठ - १/२ टेबलस्पून १७. साखर - २ टेबलस्पून
साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...
घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात पिठीसाखर, तेल, लिंबूसत्व, हिंग, हळद, पाणी घालून त्याचे पातळसर मिश्रण तयार करून घ्यावे. २. आता मिक्सर लावून हे मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये १ ते दिड मिनिट फिरवून घ्यावे. ३. त्यानंतर दिड कप बेसन घेऊन त्याच मिश्रणात मिक्सरमध्ये हे बेसन घालावे. बेसन घातल्यानंतर त्यात पाऊण कप पाणी ओतून घ्यावे. ४. आता मिक्सर फिरवून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. (ढोकळ्याचे हे मिश्रण अतिशय पातळ किंवा फार घट्ट करु नये. ढोकळ्याचे मिश्रण हे मध्यम कन्सिस्टंन्सीचे असावे. )
घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...
ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...
५. मिक्सरमध्ये ढोकळ्याचे पीठ तयार करून घेतल्यानंतर ते ५ ते १० मिनिटे तसेच मिक्सरमध्ये झाकून ठेवून द्यावे. ६. आता ढोकळा वाफवून घेण्यासाठी स्टीमर किंवा कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवा. ७. ढोकळ्याचे मिश्रण ज्या भांड्यात वाफवण्यासाठी घेणार आहात त्या भांडयाला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यावे. ८. मिक्सरचे झाकण उघडून त्यात खाण्याचा सोडा व चवीनुसार मीठ घालून घ्यावे, आता १५ ते २० सेकंदांसाठी पुन्हा हे सगळे जिन्नस एकजीव होण्यासाठी मिक्सर फिरवून घ्यावा. ९. आता मिक्सरमधील तयार झालेले ढोकळ्याचे बॅटर तेल लावून घेतलेल्या भांड्यात व्यवस्थित ओतून घ्यावे. १०. त्यानंतर हे भांड स्टीमरमध्ये वाफवण्यासाठी ठेवून द्यावे. १५ ते २० मिनिटे ढोकळ्याला मध्यम आचेवर वाफवून घेण्यासाठी ठेवावे. ११. २० मिनिटांनंतर एक टूथपिक घेऊन ती वाफवलेल्या ढोकळ्याच्या बरोबर मधोमध रोवून बघावी. टुथपिकला जर ढोकळ्याचे मिश्रण चिकटले असेल तर तो अजूनही तयार नाही झाला असे समजावे. १२. एका मोठ्या पॅनमध्ये फोडणी तयार करण्यासाठी तेल घेऊन त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, पांढरे तीळ, पाणी, मीठ, साखर घालून ते मंद आचेवर २ ते ३ मिनिटे उकळवून घ्यावे. १३. थंड झालेल्या ढोकळ्यावर ही फोडणी घालावी. तसेच ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत.
मिश्रण फेटून न घेता तयार केलेला मऊ, जाळीदार ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.