Join us

फक्त १० मिनिटांत मिक्सरमध्येच फिरवा ढोकळ्याचं पीठ, ढोकळा होईल कापसाहून हलका-जाळीदार परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 15:54 IST

How To Make Dhokla Spongy And Fluffy At Home : How to Make Soft and Spongy Dhokla : Easy Dhokla Recipe Anyone Can Make : Soft Perfect Khaman Dhokla - Instant Spongy No Fail Dhokla : ढोकळा परफेक्ट करणं हे काही सोपं काम नाही, ही घ्या एक मस्त झटपट रेसिपी...

पिवळा धम्मक, मऊ, जाळीदार, लुसलुशीत ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाणे याहून मोठे सुख नाही. ढोकळा हा असा पदार्थ आहे की जो सगळ्यांनाच अतिशय आवडतो. ढोकळा चवीला जितका (How To Make Dhokla Spongy And Fluffy At Home) सुंदर लागतो तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मजा येते. ढोकळा (How to Make Soft and Spongy Dhokla) हा एक असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. ढोकळा (Soft Perfect Khaman Dhokla - Instant Spongy No Fail Dhokla) आपण काहीवेळा बाजारांतून विकत आणतो किंवा काही गृहिणी घरी देखील ढोकळा बनवतात. घरच्या घरीच ढोकळा तयार करायचा म्हटलं की त्याचे बॅटर व्यवस्थित तयार करावे लागते. ढोकळ्याचे (Easy Dhokla Recipe Anyone Can Make) पीठ तयार करताना जर काही चुकले तर मग ढोकळा हमखास फसतोच. 

जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार झाला तरच तो खाण्यात मजा येते. परंतु काहीवेळा ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. अशावेळी ढोकळा मनासारखा न फुलता फसला तर हिरमोड होतो, आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी फेरल्यासारखे होते. त्यामुळे ढोकळा बनवताना तो चांगला फुलून यावा यासाठी सर्वात आधी त्याचे बॅटर व्यवस्थित तयार करावे लागते. यासाठी बॅटर आधी फेटून घ्यावे लागते. परंतु आपण आता एक नवी ट्रिक वापरुन देखील बॅटर न फेटता ढोकळा तयार करु शकतो. मऊ व जाळीदार ढोकळा तयार करण्यासाठी त्याचे बॅटर मिक्सरच्या मदतीने कसे फेटून घ्यावे याची सोपी ट्रिक पाहूयात.   

साहित्य :- 

१. बेसन - २ कप२. तेल - ४ टेबलस्पून ३. साखर - २ टेबलस्पून ४. लिंबू सत्व - १ टेबलस्पून ५. हिंग - १/४ टेबलस्पून ६. हळद - १/४ टेबलस्पून ७. हिरव्या मिरच्या - ४ मिरच्या ८. मीठ - चवीनुसार९. पाणी - १ + १/२ कप १०. खायचा सोडा - १ टेबलस्पून 

फोडणीसाठी... 

१०. तेल - ३ टेबलस्पून ११. मोहरी - १ टेबलस्पून१२. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ १३. कडीपत्ता - ८ ते १० पाने१४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून १५. पाणी - १ कप १६. मीठ - १/२ टेबलस्पून १७. साखर - २ टेबलस्पून 

फक्त १० मिनिटांत करा कैरी - पापड चाट! आंबटगोड इंन्स्टंट रेसिपी-उन्हाळ्यासाठी खास पदार्थ...

फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

कृती :- 

१. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात बेसन, तेल, साखर, लिंबू सत्व, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी असे सगळे जिन्नस एकत्रित घालून त्याचे मिश्रण वाटून घ्यावे. २. मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये १ ते दिड मिनिट फिरवून घ्यावे. (ढोकळ्याचे हे मिश्रण अतिशय पातळ किंवा फार घट्ट करु नये. ढोकळ्याचे मिश्रण हे मध्यम कन्सिस्टंन्सीचे असावे. )३. आता एका कडा असलेल्या डिशला तेल लावून ग्रीस करून घ्यावे. त्यानंतर ढोकळा वाफवून घेण्यासाठी स्टीमर किंवा कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवा. ४. मिक्सर मधील मिश्रणात खायचा सोडा घालावा. आणि मिक्सर पुन्हा १ ते २ सेकंदांसाठी फिरवून घ्यावा.  ५. आता मिक्सरमधील तयार झालेले ढोकळ्याचे बॅटर तेल लावून घेतलेल्या भांड्यात व्यवस्थित ओतून घ्यावे. 

चैत्रगौरी स्पेशल : फक्त १५ मिनिटांत करा भूईमुगाचे वडे, हळदीकुंकू समारंभासाठी स्पेशल बेत-उपवासालाही चालतो!

१०. त्यानंतर हे भांड स्टीमरमध्ये वाफवण्यासाठी ठेवून द्यावे. १५ ते २० मिनिटे ढोकळ्याला मध्यम आचेवर वाफवून घेण्यासाठी ठेवावे. ११. २० मिनिटांनंतर एक टूथपिक घेऊन ती वाफवलेल्या ढोकळ्याच्या बरोबर मधोमध रोवून बघावी. टुथपिकला जर ढोकळ्याचे मिश्रण चिकटले असेल तर तो अजूनही तयार नाही झाला असे समजावे. १२. एका मोठ्या पॅनमध्ये फोडणी तयार करण्यासाठी तेल घेऊन त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, पांढरे तीळ, पाणी, मीठ, साखर घालून ते मंद आचेवर २ ते ३ मिनिटे उकळवून घ्यावे. १३. थंड झालेल्या ढोकळ्यावर ही फोडणी घालावी. तसेच ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. 

मिश्रण फेटून न घेता तयार केलेला मऊ, जाळीदार ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती