गरमीच्या दिवसात वातावरणातील उष्णतेमुळे अचानक दूध फाटते म्हणजेच दूध खराब झाल्यामुळे हे वापरण्यायोग्य राहत नाही. (Cooking Hacks) गरम केल्यानंतर दुधाच्या गुठळ्या पडू लागतात आणि पाणी वेगळे होते. दूध खराब झाल्यानंतर ते फेकून देण्यापेक्षा घरीच सोप्या पद्धतीने तुम्ही बर्फी बनवू शकता. मोजक्या साहित्यात ही बर्फी बनून तयार होतील. (Milk Barfi Recipe) काहीजण फाटलेल्या दुधाचे पनीर बनवतात. पनीर बनवण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात ही स्वादीष्ट मिठाई तयार होईल (Dhoodhachi Barfi Recipe)
दूधाची बर्फी कशी बनवायची? (How to make dhoodh Barfi)
१) सगळ्यात आधी दुधाला सुटलेलं पाणी गाळून पाणी आणि जाडसर मलई वेगळी करा. पाणी पूर्ण वेगळे केल्यानंतर वर राहिलेला भाग मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या. बारीक करताना त्यात १ कप साखर, १ कप दूध पावडर, १ कप पाणी घालून मिश्रण एकजीव करू घ्या.
साबुदाणे न भिजवता करा कुरकुरीत उपवासाची भजी; खमंग-कमी तेल पिणाऱ्या भजीची सोपी पद्धत
२) नंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तूप घालून त्यात हे मिश्रण घाला. मंच आचेवर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून २ ते ३ मिनिटं शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.
३) एका भांड्याला तूप लावून त्यात हे मिश्रण घालून व्यवस्थित सेट करा. नंतर त्यावर ड्रायफ्रुट्स घालून सेट करा. तयार मिश्रणावर ड्रायफ्रुट्सचे काप घालून चौकोनी काप करून घ्या. तयार आहे दूधाची बर्फी
फाटलेल्या दूधापासून तुम्ही पनीरही बनवू शकता.
- त्यासाठी सगळ्यात दूध उकळताना पाणी वेगळे झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. गॅसची आस मंद ठेवा. नंतर चमच्याच्या साहाय्याने मिश्रण ढवळत राहा. यामुळे दूध व्यवस्थित फाटेल. नंतर गाळणीने गाळून पाणी वेगळे करा आणि कॉटनच्या कापडात दूधाचे मिश्रण घट्ट बांधून ठेवा. ५ ते ६ तासांनी पनीर तयार झालेलं असेल.
देवीच्या नैवेद्याला करा मऊ पायनॅप्पल शीरा; तोंडात टाकताच विरघळेल-चविष्ट नैवेद्य झटपट बनेल
- दूध फाटलं असेल तर तुम्ही पाण्याच्या बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला वाटत असेल की दूध फाटत आहे तेव्हा दूध गरम करताना तुम्ही यात हे पाणी घालून मिसळा. हळू हळू दूधपासून पाणी वेगळे होईल. हे मिश्रण तुम्ही पनीरप्रमाणे वापरू शकता.