Lokmat Sakhi >Food > साखर, गूळ न घालता करा बिनापाकाचे डिंकाचे लाडू! पाहा भरपूर एनर्जी देणाऱ्या लाडूची सोपी रेसिपी 

साखर, गूळ न घालता करा बिनापाकाचे डिंकाचे लाडू! पाहा भरपूर एनर्जी देणाऱ्या लाडूची सोपी रेसिपी 

Dink Ladoo Recipe For Winter: थंडीत खाण्यासाठी पौष्टिक डिंक लाडूच्या रेसिपीच्या शोधात असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकते.(how to make dink ladoo without adding sugar and jaggery?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 03:16 PM2024-11-21T15:16:06+5:302024-11-21T15:17:02+5:30

Dink Ladoo Recipe For Winter: थंडीत खाण्यासाठी पौष्टिक डिंक लाडूच्या रेसिपीच्या शोधात असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकते.(how to make dink ladoo without adding sugar and jaggery?)

how to make dink ladoo without sugar and jaggery, simple recipe of making gondh ladoo | साखर, गूळ न घालता करा बिनापाकाचे डिंकाचे लाडू! पाहा भरपूर एनर्जी देणाऱ्या लाडूची सोपी रेसिपी 

साखर, गूळ न घालता करा बिनापाकाचे डिंकाचे लाडू! पाहा भरपूर एनर्जी देणाऱ्या लाडूची सोपी रेसिपी 

Highlightsडिंकाचे लाडू करण्याच्या तयारीला लागला असाल तर ही रेसिपी एकदा बघून घ्या.

थंडी आता चांगलीच जाणवायला लागली आहे. वातावरणात असलेल्या गारव्यामुळे सध्या सकाळी- रात्री स्वेटर, शाल असे उबदार कपडे घालावेच लागत आहेत. अशी सगळीकडे थंडी पसरली की हमखास आठवण येते ती पौष्टिक डिंक लाडूंची. या दिवसांत शरीर उबदार ठेवणारे, हाडांना मजबूत करणारे डिंक लाडू आवर्जून खायलाच पाहिजेत, असं आहारतज्ज्ञही नेहमीच सांगतात. त्यामुळेच आता तुम्हीही डिंकाचे लाडू करण्याच्या तयारीला लागला असाल तर ही रेसिपी एकदा बघून घ्या. या रेसिपीमध्ये आपण साखर, गूळ असे गोड पदार्थ घालणार नाही (how to make dink ladoo without adding sugar and jaggery?). त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही हे लाडू खाता येतील. (simple recipe of making gondh ladoo)

 

साखर, गूळ न घालता डिंकाचे लाडू कसे तयार करावे?

साखर, गूळ यांचा पाक न करता सोप्या पद्धतीने डिंक लाडू कसे करावे, याची रेसिपी Sarita's Kitchen या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

४ वाट्या किसलेले सुके खोबरे 
 
अर्धी वाटी तीळ

'६-६-६' चा नवा नियम; वजन कमी करून फिट राहण्याचा खास उपाय, पाहा तुमच्यासाठी किती फायदेशीर

२ टीस्पून खसखस 2 
 
२ टेबलस्पून मेथ्या

दिड वाटी तूप  

१ वाटी खारीक पावडर

१ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ

पाऊण वाटी डिंक

जुने झालेले सोफा कव्हर फेकता कशाला? पाहा एक से एक आयडिया- वापरा ४ पद्धतींनी झटपट
 
पाऊण वाटी बदामाचे तुकडे

पाऊण वाटी काजूचे तुकडे

अर्धा किलो खजूर 
 
२ चमचे सुंठ पावडर 

 

कृती

सगळ्यात आधी खोबरे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर खसखस, मेथ्या, तीळ भाजून घ्या.

भाजून घेतलेले पदार्थ कढईतून बाहेर काढा आणि थोडेसे तूप टाकून खारीक पावडर, मुगाच्या डाळीचे पीठ, काजू- बदामाचे तुकडे एकेक करून परतून घ्या.

गुरुपुष्यामृत २०२४: सोन्याच्या कमी वजनाच्या अंगठ्यांचे नाजूक डिझाईन्स- कमी पैशांत घ्या सुंदर अंगठी

यानंतर खजूराच्या बिया काढा आणि ते मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून खजूर पावडर परतून घ्या.

काजू, बदामाचे तुकडे, खसखस, मेथ्या, तीळ हे सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक करून त्यांची पावडर करून घ्या.

सगळे पदार्थ एका मोठ्या भांड्यात एकत्र करा आणि तूप टाकून व्यवस्थित मळून घ्या. सगळे पदार्थ छान एकजीव झाले की मग त्याचे लाडू वळा. हे लाडू महिनाभर अगदी चांगले राहतात. 

 

Web Title: how to make dink ladoo without sugar and jaggery, simple recipe of making gondh ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.