हिवाळ्याच्या (Winter Health Tips) दिवसांत इम्यूनिटी कमकुवत होते आणि सर्दी, खोकला यासांरखे आजार होतात. वयस्कर लोकांना संधीवात, कंबरदूखी, गुडघेदुखी अशा समस्या जाणवतात. (Dinkache ladoo Kase kartat) अशावेळी पौष्टीक पदार्थ खाण्याची गरज असते. थंडीच्या दिवसात मेथीचे डिंकाचे लाडू खाल्ले जातात. (Dinkache ladoo recipe marathi) कारण यातून शरीराला गरमी मिळते आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते. डिंकाचे लाडू करायला जास्त वेळही लागत नाही. रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला पूर्ण दिवस फ्रेश एर्नेजेटिक वाटेल. डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make gond ke ladoo)
पौष्टीक डिंकाचे लाडू करण्याची सोपी पद्धत (Gond ke Ladoo Making Process)
1) डिंकाचे लाडू बनवण्यासाठी १ कप गव्हाचे पीठ घ्या, त्यात ४ टेबलस्पून साजूक तूप घाला. नंतर ३ टेबलस्पून रूम टेम्परेचरवर असलेले दूध घालून पीठ एकजीव करून घ्या. दूध जास्त घालू नका कारण आपल्याला पीठ मळायचं नाही. फक्त पीठात मॉईश्चर यावे यासाठी हे साहित्य घालायचे आहे. एकजीव केल्यानंतर एका भांड्यात दाबून या पिठावर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासाने पुन्हा पीठ हाताने फोडून चाळून घ्या. पिठात गुठळ्या राहणार नाही याचा काळजी घ्या.
१ वाटी रव्याचे करा कुरकुरीत-मऊ मेदू वडे; डाळ न दळता- न भिजवता १० मिनिटांत बनतील वडे
2) गॅसवर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तूप घाला. ५० ग्राम डिंकाचे तुकडे करून तुपात तळून घ्या. तेल जास्त गरम असू नये. मंच आचेवर तळा. अन्यथा डिंक करपतो किंवा आतून कच्चा राहतो. डिंक तळून फुलल्यानंतर एका ताटात काढून घ्या. नंतर त्याच तुपात गव्हाचे चाळेलेलं पीठ भाजून घ्या. तुम्ही यात अजून तूप घालू शकता. पीठ गोल्डन होईपर्यंत तसंच पिठाचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
3) त्यात एक कप बारीक केलेले काजू, एक कप बदामाचे पातळ काप घालून परतवून घ्या. त्यात अर्धा कप बारीक किसलेलं सुकं खोबरं घाला. यात डिसिकेटेड कोकोनट वापरू नका कारण त्याची चव फार चांगली येत नाही. यात सुक्या खोबऱ्याचाच वापर करा. खोबरं लालसर झाल्यानंतर सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
4) कढईत एक कप गूळ आणि ४ चे ५ टेबलस्पून पाणी घालून गूळ वितळवून घ्या. गूळ वितळेपर्यंत तळलेला डिंक फोडून घ्या. डिंक व्यवस्थित तळून झाला असेल तर लगेच फुटेल.
५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस
5) डिंक गव्हाच्या पिठात मिसळून घ्या आणि मध्ये जागा तयार करून त्यात वितळेला गूळ घाला. त्यात वेलची पावडर, आल्याची पावडर घालून एकजीव करून घ्या. १० मिनिटांनी मिश्रण झाल्यानंतर थोडं थोडं पिठ घेऊन लाडू वळून घ्या. तयार आहेत डिंकाचे लाडू.