Lokmat Sakhi >Food > डोसा तव्याला चिकटतो-परफेक्ट बनत नाही? पीठ दळताना १ ट्रिक वापरा, हॉटेलस्टाईल कुरकुरीत बनेल डोसा

डोसा तव्याला चिकटतो-परफेक्ट बनत नाही? पीठ दळताना १ ट्रिक वापरा, हॉटेलस्टाईल कुरकुरीत बनेल डोसा

How To Make Dosa At Home : जेव्हा डोश्याचं बॅटर फुलून तयार होईल तेव्हा डोसा बनवण्यासाठी तयार असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 02:54 PM2024-10-20T14:54:07+5:302024-10-20T14:57:44+5:30

How To Make Dosa At Home : जेव्हा डोश्याचं बॅटर फुलून तयार होईल तेव्हा डोसा बनवण्यासाठी तयार असेल.

How To Make Dosa At Home : Dosa Making tips How To Make Crispy Dosa At Home | डोसा तव्याला चिकटतो-परफेक्ट बनत नाही? पीठ दळताना १ ट्रिक वापरा, हॉटेलस्टाईल कुरकुरीत बनेल डोसा

डोसा तव्याला चिकटतो-परफेक्ट बनत नाही? पीठ दळताना १ ट्रिक वापरा, हॉटेलस्टाईल कुरकुरीत बनेल डोसा

सााऊथ इंडियन (South Indian) पदार्थांमध्ये डोशाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. दक्षिण भारतातच नाही तर देशाच्या अनेक  भागात डोसा बनवला जातो.  डोश्याचे पीठ तुम्ही कसं तयार करता त्यावर डोश्याची चव अवलंबून असते.  (Cooking Hacks) रेस्टॉरंटसारखं डोसा बॅटर तुम्ही घरच्याघरी तयार करू शकता. डोश्याचं पीठ तयार करण्याची सोपी पद्धत पाहूया.  ही पद्धत फॉलो केल्यास डोसा तव्याला चिकटणार नाही आणि पटापट डोसे काढून होतील. (How To Make Dosa At Home)

डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Tips For Dosa Making At Home)

१) उडीदाची डाळ- १ कप

२) तांदूळ - २ कप

३) मेथीचे  दाणे- १ चमचा

४) मीठ- चवीनुसार

डोसा बॅटर तयार करण्याची योग्य पद्धत (How To Make Perfect Dosa)

उडीदाची डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ४ ते ५ तासांसाठी भिजवून ठेवा. भिजवलेले डाळ तांदूळ वेगवेगळे वाटून घ्या. डाळ जाडसर वाटा आणि तांदूळ बारीक वाटा. वाटलेली  डाळ आणि तांदूळ एका खोल, पसरट भांड्यात  ठेवा. त्यात २ चमचे भिजवलेल्या मेथीचे दाणे वाटून घाला आणि मीठ व्यवस्थित मिसळा.  हे मिश्रण झाकून एखाद्या गरम ठिकाणी ८ ते १० तासांसाठी तसंच ठेवून द्या.

जेव्हा डोश्याचं बॅटर फुलून तयार होईल तेव्हा डोसा बनवण्यासाठी तयार असेल. डोशाचं पीठ पातळ करण्याासाठी तुम्ही त्यात थोडं पाणी मिसळू शकता. डोशाचं पीठ गरम ठिकाणी ठेवा जेणेकरून ते लवकर आंबून तयार होईल. डोसा बनवण्यासाठी  तवा व्यवस्थित गरम करून घ्या.  तव्याला तेल लावून डोसा पसरवून घ्या.

डोसा बनवण्यासाठी लोखंडी तवा वापरला जातो कारण डोश्याला त्यामुळे चव येते. तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता. डोसा तयार करण्यासठी सगळ्यात आधी तवा गरम होऊ द्या त्यानंतर तेलाचे काही थेंब  त्यावर घाला आणि तवा पुसून पीठ परसवा. डोसा कुरकुरीत होण्याासठी तव्यावर जास्त तेल घालू नका. कांदा  चिरून कांद्याच्या  वरच्या भागानं तव्यावर थोडं तेल पसरवा. 

Web Title: How To Make Dosa At Home : Dosa Making tips How To Make Crispy Dosa At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.