Lokmat Sakhi >Food > ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी

ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी

Dosa Recipe Using Brown Rice: तब्येतीच्या काळजीपोटी अनेक जण आवडत असूनही डोसा खात नाहीत. अशा फिटनेस फ्रिक लोकांसाठी ही एक खास रेसिपी..(food and recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 05:59 PM2023-01-07T17:59:04+5:302023-01-07T18:02:06+5:30

Dosa Recipe Using Brown Rice: तब्येतीच्या काळजीपोटी अनेक जण आवडत असूनही डोसा खात नाहीत. अशा फिटनेस फ्रिक लोकांसाठी ही एक खास रेसिपी..(food and recipe)

How to make dosa batter at home using brown rice? Special healthy recipe of dosa with brown rice | ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी

ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी

Highlightsब्राऊन राईस वापरूनही डोसाचा रंग फारसा बदलत नाही आणि चवही आपल्या नेहमीच्या डोसासारखीच लागते.

इडली, डोसा, उतप्पा असे दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्या भारतातच मोठ्या आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ असणारा नाश्ता लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा ठरतो. पण तरीही या पदार्थांमध्ये पांढरा तांदुळ जास्त प्रमाणात असल्याने अनेक फिटनेस फ्रिक लोक आवडत असूनही हे पदार्थ खाणं टाळतात. अशा लोकांसाठी ही एक खास रेसिपी (healthy recipe of dosa with brown rice). जसं भात- खिचडी या पदार्थांमध्ये पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस वापरता, तसंच आता डोसा तयार करण्यासाठीही ब्राऊन राईस वापरून बघा.(How to make dosa batter using brown rice)

ब्राऊन राईस वापरून घरच्याघरी डोसा पीठ कसं तयार करायचं, याची सोपी रेसिपी इन्स्टाग्रामच्या mucherla.aruna या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर- डिझायनर काळी साडी, बघा स्वस्तात मस्त ३ पर्याय

रेसिपी अतिशय सोपी असून ब्राऊन राईसमुळे हे पीठ अधिक पौष्टिक होतं. शिवाय ब्राऊन राईस वापरूनही डोसाचा रंग फारसा बदलत नाही आणि चवही आपल्या नेहमीच्या डोसासारखीच लागते. त्यामुळे एकदा अशा पद्धतीने ब्राऊन राईस वापरून डोसा पीठ करून बघायला हरकत नाही.



ब्राऊन राईस वापरून डोसा कसा तयार करायचा?
साहित्य

३ वाट्या ब्राऊन राईस

१ वाटी पांढरा तांदूळ

स्पेशल राजस्थानी कढी! चव अशी की अहाहा.... पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी, हिवाळ्यातला गरमागरम बेत

१ वाटी उडीद डाळ

२ टेबलस्पून हरबरा डाळ

१ टेबलस्पून मेथीचे दाणे



कृती
१. सगळ्यात आधी डाळ आणि दोन्ही प्रकारचे तांदूळ २ ते ३ वेळा पाणी बदलून व्यवस्थित धुवून घ्या.

२. त्यानंतर त्यामध्ये हरबरा डाळ आणि मेथीचे दाणे टाका. हरबऱ्याची डाळ वापरल्याने डोस छान कुरकुरीत होतात.

५ नॅचरल ॲण्टीएजिंग पदार्थ! नियमित खा, त्वचा राहील चमकदार- सुंदर, विकतच्या क्रिमची गरजच नाही

३. हे सगळं मिश्रण एकत्र करून ६ ते ८ तास भिजत ठेवा.

४. त्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि आंबविण्यासाठी म्हणजेच फर्मेंट होण्यासाठी पुन्हा ७ ते ९ तास झाकून ठेवा.

५. त्यानंतर पीठ छान फुलून आलं की त्यात चवीनुसार मीठ घाला आणि त्याचे नेहमीप्रमाणे डोसे करा.


 

Web Title: How to make dosa batter at home using brown rice? Special healthy recipe of dosa with brown rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.