Lokmat Sakhi >Food > रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

How to make Dosa from leftover Khichdi : तुम्हालाही सकाळच्यावेळी  खिचडी खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही उरलेल्या खिचडीपासून कुरकुरीत, खमंग डोसा बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:47 AM2023-10-09T11:47:52+5:302023-10-09T11:53:17+5:30

How to make Dosa from leftover Khichdi : तुम्हालाही सकाळच्यावेळी  खिचडी खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही उरलेल्या खिचडीपासून कुरकुरीत, खमंग डोसा बनवू शकता.

How to make Dosa from leftover Khichdi : Dosa from leftover Khichdi Easy Recipe | रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

 रात्रीच्या जेवणासाठी अनेक खिचडी, भात बनवणं पसंत करतात. कारण भात-खिचडी असे पदार्थ बनवायला अतिशय सोपे असतात. खिचडी भात बनवायला जास्त वेळही लागत नाही. रात्री खिचडी खाल्ल्यानंतर नाश्त्याला परत तिच खिचडी खायला कंटाळा येतो. (leftover Khichdi Dosa Recipe)

तुम्हालाही सकाळच्यावेळी  खिचडी खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही उरलेल्या खिचडीपासून कुरकुरीत, खमंग डोसा बनवू शकता. यामुळे खिचडी वाया जाणार नाही आणि कमीत कमी वेळात डोसा बनून तयार होईल. ही खिचडी बनवायला अतिशय सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सगळेचजण ही खिचडी आवडीने खातील. (How to make khichdi dosa)

खिचडीचा डोसा बनवण्याचे साहित्य
 
१) उरलेली खिचडी-  २ वाट्या

२) चिली फ्लेक्स- २ ते ३ चमचे

३) मीठ - चवीनुसार

४) कोथिंबीर- २ ते ३ टिस्पून

५) पाणी- गरजेनुसार

६) तेल- डोसा काढण्यासाठी

शिळ्या खिचडीचा डोसा बनवण्याची कृती

1) उरलेल्या खिचडीचा डोसा बनण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात मावेल इतकी शिळी खिचडी टाकून घ्या.  त्यात थोडं पाणी घालून डोश्याच्या बॅटरमध्ये मध्यम पातळ पेस्ट बनवून घ्या.  ही पेस्ट एका भांड्यात काढा.

पुरणपोळी ना फाटणार, ना पुरण बाहेर येणार; पोळी लाटण्याची सोपी पद्धत-परफेक्ट बनेल पोळी

2)त्यानंतर चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. तयार मिश्रणात तुम्ही  हळद किंवा लाल तिखट घालू शकता. त्यानंतर पीठ एकाच दिशेने फिरवून घ्या.

3) तव्याला ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित तेल लावून नंतर त्यावर डोसा पसरवा. डोसा व्यवस्थित पसरवल्यानंतर खालच्या बाजून शिजू द्या.

4) डोश्यावर वरच्या बाजूने तुम्ही तेल पसरवू शकता. डोसा खमंग भाजून झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. तयार आहे गरमागरम  खिचडीचा डोसा.

उरलेल्या भाताचे १० मिनिटांत करा खमंग मेदूवडे; झटपट बनतील कुरकुरीत वडे, पाहा सोपी रेसिपी

५) खिचडीत अनेक प्रकारचे प्रोटीन्स, फायबर्सचे कॉम्बिनेशन असते.  खिचडीचा आहारात समावेश केल्यास पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहते. आजारी असल्यानंतरही खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण हे अतिशय पचायला हलके आणि पौष्टीक असे अन्न आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी आहारात खिचडीचा समावेश करायला हवा. 
 

Web Title: How to make Dosa from leftover Khichdi : Dosa from leftover Khichdi Easy Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.