रोजच्या जेवणात भात (Leftover Rice) असतोच अशी अनेक घरं आहेत. दुपारचा किंवा रात्रीचा उरलेला भात टाकून देण्यापेक्षा १ कांदा चिरून फोडणीचा भात करून लोक नाश्त्याला किंवा जेवणाला खातात. (Urlelya bhatacha dosa) शिळा, उरलेला भात डाळीबरोबर खायचा म्हटलं तर तो खूपच कडक झालेला असतो. म्हणून ताज्या भाताप्रमाणे डाळ किंवा भाजीबरोबर खाता येत नाही. त्याची चवही बदलते. (Instant Dosa From Leftover Rice)
जास्तीचा भात बनवला असेल जेवणानंतर भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करण्यापेक्षा चविष्ट डोसा बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांनाही फोडणीच्या भातापेक्षा इडली-डोसा खायला नक्की आवडेल. हे डोसे तुम्ही नारळाची चटणी किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता. भाताचा डोसा तव्याला चिकटेल का, बिघडणार तर नाही ना, असं तुम्हालाही वाटत असेल तर उरलेल्या भाताचा डोसा करण्याची परफेक्ट रेसिपी पाहूया. (How to make Dosa From Leftover Rice)
उरलेल्या भाताचा डोसा करण्याची सोपी रेसिपी (Instant Dosa With Leftover Cooked Rice)
१) सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात घाला. त्यात वाटीभर रवा घाला. जास्त बारीक रवा घालू नका. उपमा, शीरा करण्यासाठी वापरला जातो त्या रव्याचा वापर करा. नंतर त्यात १ वाटी दही घाला. दह्यामुळे डोशाला आंबटपणा येईल आणि चांगली चवही येईल. याशिवाय दह्यामुळे पीठ व्यवस्थित तयार होण्यास मदत होते.
थंडीत रोज चपातीबरोबर १ गुळाचा खडा खा, हाडं होतील बळकट-हिमोग्लोबिन भरपूर वाढेल
२) जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिश्रण मिक्सरला फिरवून घ्या. इडलीच्या पिठाप्रमाणे या मिश्रणाची कंसिटन्सी झाल्यानंतर हे मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या. यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून पुन्हा एकजीव करून घ्या.
३) नॉन स्टिक तव्यावर तेल गरम करून डोश्याचे पीठ घाला आणि डोसा गोलाकार पसरवून घ्या. डोशा अर्धवट शिजल्यानंतर कडेच्या बाजूने तेल सोडत राहा. डोसा शिजल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने काढून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या. नंतर डोसा एका ताटात काढून घ्या.
१ कप बेसनाचा करा मऊ, स्पॉन्जी इडली ढोकळा; इडलीच्या स्टॅण्डमध्ये १० मिनिटांत बनेल चविष्ट नाश्ता
४) यात तुम्ही शेजवान चटणी घालून किंवा बटाट्याची भाजी घालून आपल्या आवडीनुसार डोसा तयार करू शकता. गरमागरम डोसा ओल्या खोबऱ्याची चटणी किवा सांभारबरोबर सर्व्ह करा.