Lokmat Sakhi >Food > पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

How to make Dough for Parathas : जर आपल्याला सॉफ्ट आणि टेस्टी पराठा तयार करायचा असेल तर पराठ्यांसाठी कणीक मळण्याची योग्य पद्धत पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 07:19 PM2024-07-22T19:19:47+5:302024-07-22T19:36:05+5:30

How to make Dough for Parathas : जर आपल्याला सॉफ्ट आणि टेस्टी पराठा तयार करायचा असेल तर पराठ्यांसाठी कणीक मळण्याची योग्य पद्धत पाहूयात.

How to make Dough for Parathas | पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

रोजच्या जेवणात चपातीचा कंटाळा की आपण वेगळं म्हणून पराठा बनवतो. पराठा हा असा पदार्थ आहे की, आपण सकाळच्या नाश्त्याला, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण म्हणून कधीही खाऊ शकतो. पराठ्याचे अनेक प्रकार असतात. मेथी पराठा, बटाट्याचा पराठा, पालक पराठा अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून त्यांचे पराठे आपण बनवू शकतो. पराठा हा सर्वात सोपा आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे. पराठ्यांचे प्रकार आणि त्यांची रेसिपी ही प्रत्येक घरोघरी वेगळी असते. वेगवेगळ्या भाज्या घालून बनवलेले पराठे हेल्दी तर असतातच पण करायलाही सोपे असतात(How to make Dough for Parathas).

पराठे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते परंतु काहीवेळा आपला पराठा बिघडतो. पराठ्याच्या बाहेरचे आवरण व्यवस्थित होत नाही. चपातीसारखे गव्हाचे पीठ मळून त्यात भाज्यांचे स्टफिंग भरून पराठा बनवला जातो परंतु यामुळे पराठा नीट होत नाही. पराठा बनवताना पराठ्यांसाठी कणीक भिजवताना ते कणीक आपण चपाती सारखेच मळून तयार करतो, परंतु ही पराठ्यांसाठी कणीक भिजवण्याची योग्य पद्धत नाही. जर आपल्याला सॉफ्ट आणि टेस्टी पराठा तयार करायचा असेल तर पराठ्यांसाठी कणीक मळण्याची योग्य पद्धत पाहूयात. 

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - २ कप
२. मीठ - १ टेबलस्पून 
३. तेल किंवा तूप - २ टेबलस्पून 
४. पाणी - आवश्यकतेनुसार 
५. मैदा - १/२ कप 

पराठ्यांसाठी अशी भिजवा कणीक... 

१. मैदा, गव्हाचे पीठ एकत्रित भिजवा :- एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून हे दोन्ही जिन्नस एकजीव करुन घ्यावे. 

२. तेल किंवा तूप घाला :- आता पिठात २ टेबलस्पून तेल किंवा तूप घाला. यामुळे पराठे मऊ होण्यास मदत होईल.

हा घ्या ताकदीचा सुपरडोस; १५ मिनिटांत करा मखाण्याचा उत्तपा- नाश्ता हेल्दी, पुरेल दिवसभर एनर्जी...

३. पाणी घाला :- या पिठात गरजेनुसार हळूहळू थोडे थोडे पाणी घालावे आणि पीठ चांगले मळून घ्यावे. नेहमी थोडे थोडे पाणी घालावे जेणेकरून पीठ जास्त ओले होणार नाही.

४. पीठ मळणे : - पीठ गुळगुळीत आणि मऊ होण्यासाठी हाताने चांगले मळून घ्या. पीठ मळताना जास्त दाब देण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा.

मुसळधार पावसात खा गरमागरम मक्याचे आप्पे, झटपट होणारी खमंग, क्रिस्पी सोपी रेसिपी... 

५. पीठ झाकून ठेवा :- मळलेले पीठ ओल्या कपड्याने १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा. यामुळे पीठ पूर्णपणे मऊ होईल आणि पराठे बनवायला सोपे जाईल.

६. पीठ पुन्हा मळून घ्या :- पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवल्यानंतर ते पुन्हा हलक्या हाताने मळून घ्यावे. अशा प्रकारे तुमचे पीठ आता पराठे बनवण्यासाठी तयार आहे. आता तुम्ही या पिठाचे पराठे लाटून बनवू शकता.

मूगडाळ-पनीर चिला म्हणे जान्हवी कपूरला आवडतो फार, पाहा आपल्या पारंपरिक धिरड्याचाच नवा प्रकार...

Web Title: How to make Dough for Parathas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.