'लसूण' हा भारतीय जेवणातला सगळ्यांत मुख्य पदार्थ मानला जातो. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव इतर पदार्थांमध्ये उतरते व जेवणाचा स्वाद वाढवते. भाजी, डाळ किंवा इतर पदार्थांना फोडणी देण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय आपले भारतीय पदार्थ बनूच शकत नाहीत. लसूण ही जशी स्वयंपाकात वापरली जाते तशीच तिच्या औषधी गुणधर्मामुळे तिचा वेगवेगळ्या समस्यांवर औषध म्हणून देखील वापर केला जातो.
लसूण ही रोजच्या स्वयंपाकात वापरल्याने पदार्थांना उत्तम चव येते. अशी ही लसूण कितीही बहुगुणी व बहूउपयोगी असली तरीही लसूण सोलणे हे कंटाळवाणे काम कोणत्याही गृहिणीला मनापासून आवडत नाही. लसूण ही रोजच्या वापरात लागतेच त्यामुळे लसूण सोलणे हे काम आपसूकच आपल्याला रोज करावे लागते. काहीवेळा सकाळच्या कामाच्या गडबडीत आपल्याला लसूण सोलायला तितकासा वेळ नसतो अशा परिस्थिती लसूण न घातला देखील स्वयंपाक होऊ शकत नाही. अशावेळी नक्की काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. असा कोणता उपाय आहे का ज्यामुळे रोज रोज लसूण सोलण्याचे हे कंटाळवाणे काम कायमचे करावे लागणार नाही, अशा विचारात गृहिणी असतात. तर गृहिणींसाठी एक सोपा उपाय आहे ज्यामुळे त्यांना वारंवार लसूण सोलण्याचे काम करावे लागणार नाही(How To Make Dry Garlic Powder At Home).
लसूण सोलण्याच्या कंटाळवाण्या कामापासून अशी करा सुटका....
१. सर्वप्रथम, अर्धा किलो लसूण घेऊन त्याच्या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या करून घ्याव्यात.
२. या लसूण पाकळ्यांची साल सोलून घ्यावी.
३. लसूण पाकळ्यांची साल सोलून घेतल्यानंतर त्यांचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत.
रोजचं वरण होईल आता एकदम चविष्ट, घरीच करा खास पारंपरिक आमटी मसाला...
४. आता एका पॅनमध्ये वाटीभर रवा घालून तो थोडा मंद आचेवर हलका गरम करून घ्यावा.
५. रवा थोडा हलका गरम झाल्यावर त्यात लसूणच्या मध्यम आकाराच्या कापून घेतलेल्या पाकळ्या घालाव्यात.
६. आता रवा आणि लसणाच्या पाकळ्या यांचा रंग जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत मंद आचेवर लसणाच्या पाकळ्या व रवा भाजून घ्यावा.
७. लसणाच्या पाकळ्या संपूर्ण गोल्डन ब्राऊन झाल्यावर एक चाळणी घेऊन हे सगळे मिश्रण एका चाळणीतून गाळून घ्यावे.
८. लसणाच्या पाकळ्या चाळणीतून गाळून रवा व लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या बाजूला काढून घ्याव्यात.
टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...
९. या लसणाच्या पाकळ्या मिक्सरला लावून त्या व्यवस्थित वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी.
१०. ही पूड मिक्सरमधून काढून परत एकदा बारीक गाळणीने गाळून घ्यावी.
११. लसणाची पावडर वापरण्यासाठी तयार आहे, ही लसणाची पूड आपण एका हवाबंद डब्यात व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. ही पावडर व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्यास पुढचे किमान ६ महिने तरी आपण ही लसणाची पावडर वापरू शकता.