सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लिंबू बऱ्याचदा घरात लागतंच. लिंबू सरबत तर नेहमीच होतं. बऱ्याचदा असं होतं की आपण जास्तीचे लिंबू घेऊन ठेवतो. पण तेवढे आपल्याकडून संपत नाहीत आणि मग ते सुकून जातात. किंवा वाळायला लागतात. अगदी फ्रिजमध्ये ठेवलले असतील तरी त्या लिंबांना एकप्रकारचा कडकपणा येतो आणि त्यांचा रंग बदलतो. मग असे लिंबू काही जणी फेकून देतात. पण अशी चूक करू नका. कारण काही साधे- सोपे उपाय केले तर हे वाळलेले लिंबूही पुन्हा रसरशीत होऊ शकतात आणि त्यातून ताज्या- फ्रेश लिंबातून मिळावा एवढा रस मिळू शकतो. त्यासाठी नेमके काय उपाय करायचे ते पाहा... (home hacks to make dry lemon again juicy and fresh)
वाळलेले लिंबू पुन्हा रसरशीत करण्याचा उपाय
१. तुमच्याकडचे लिंबू जर फ्रिजमध्ये ठेवून कडक पडले असेल आणि वाळले असेल तर हा उपाय करून पाहा. त्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या. त्यानंतर या पाण्यात लिंबू टाकून ठेवा.
बघा दह्याविषयीचे 'हे' गैरसमज तुम्हालाही आहेत का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात दही पौष्टिक आहेच, पण...
अर्ध्या ते पाऊण तासाने लिंबू पाण्यातून काढून पाहा. ते मऊ पडलेले असेल. हे मऊ झालेले लिंबू जेव्हा तुम्ही चिरून पिळाल तेव्हा त्यातून भरपूर रस येईल.
२. हा दुसरा उपाय करण्यासाठी लिंबू फ्रिजमधून बाहेर काढा आणि साधारण अर्धा तास ते रुम टेम्परेचरवर ठेवा.
सतत थकवा- गळून गेल्यासारखं होतं, ओटीपोटही सुटलं? तुमच्या शरीराला 'या' पदार्थाची गरज आहे
त्यानंतर किचन ओट्यावर किंवा तशाच एखाद्या कडक पृष्ठभाग असणाऱ्या ठिकाणी लिंबू ठेवा आणि त्यावर हात फिरवून ते २ ते ३ मिनिटांसाठी पुढे- मागे अशा पद्धतीने फिरवा. ही क्रिया हळूवार करावी. कारण जोराने केलं तर लिंबू फुटू शकतं. यानंतर तुमचं कडक असलेलं लिंबू अगदी मऊ होईल आणि त्यातून पुन्हा भरभरून रस निघेल.