चहा - चपाती हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा सकाळचा नाश्ता असतो. वाफाळत्या चहासोबत गरमागरम चपाती खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. सकाळी नाश्त्याला चहा - चपाती खाल्ली की दुपारच्या जेवणापर्यंत आपलं पोट भरलेलं रहात. काहीवेळा आपल्याला सकाळच्या नाश्त्याला रोज उपमा, पोहे खाऊन कंटाळा येतो. तसेच सकाळी कामाच्या गडबडीत आपल्याला वेगळा नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी आपण झटपट मसाला चपाती बनवून लोणचं किंवा सॉस सोबत खाऊ शकतो.
सकाळच्या नाश्त्याला चपाती एकदाच बनवली की ती दुपारच्या जेवणाला देखील होऊन जाते. आपण रोज जशी कणिक मळून चपाती बनवतो तसेच चपाती बनवून तिला थोडा मसाल्यांचा ट्विस्ट दिला तर सकाळचा नाश्ता एकदम छान चविष्ट होऊ शकतो. मसाला चपाती बनवताना रोजचीच चपाती बनवून त्यात काही मसाल्यांचे स्टफिंग भरुन आपण रोजच्याच चपातीला एका हटके वेगळ्याच नाश्त्याचे स्वरूप देऊ शकतो. मसाला चपाती बनवताना जास्त काही वेगळे असे साहित्य लागत नाही आपल्या घरात असणारे रोजचेच साहित्य वापरुन आपण झटपट मसाला चपाती बनवू शकतो. मसाला चपाती बनविण्याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Easy & Quick Soft Masala Chapati For Breakfast).
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - १ कप
२. मीठ - चवीनुसार
३. पाणी - १ कप
४. तेल - २ ते ३ टेबलस्पून
५. हळद - १ टेबलस्पून
६. काश्मिरी लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
८. धणेपूड - १ टेबलस्पून
९. जिरेपूड - १ टेबलस्पून
१०. चाट मसाला - १ टेबलस्पून
११. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
१२. बडीशेप - १ टेबलस्पून
१३. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स, किलोभर लसूणही सोलून होईल झटपट...
कृती :-
१. सर्वप्रथम एका चाळणीने गव्हाचे पीठ चाळून घ्यावे.
२. आता चपातीसाठी नेहमीप्रमाणे जशी कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घ्यावी. कणिक मळताना त्यात गरजेनुसार पाणी व तेल घालून मऊसूत कणिक मळून घ्यावे.
३. कणिक मळून झाल्यानंतर ते मुरण्यासाठी थोडा वेळ झाकून बाजूला ठेवावे.
४. आता एका बाऊलमध्ये हळद, काश्मिरी लाल तिखट मसाला, लाल तिखट मसाला, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला, कसुरी मेथी, बडीशेप घालून मसाला तयार करून घ्यावा.
५. आता तयार कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत याच्या गोल चपात्या लाटून घ्याव्यात.
फक्त २ कप रवा आणि १ ग्लास ताक, आप्पे करा मस्त - गुबगुबीत फुललेले...
६. या लाटलेल्या चपातीला थोडेसे तूप लावून संपूर्ण चपातीला पसरवून लावावे.
७. संपूर्ण चपातीला तूप लावून घेतल्यानंतर तयार केलेला मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरवून चपातीला लावून मग चपाती अर्धी दुमडून घ्यावी.
८. आता या चपातीची त्रिकोणी घडी घालून परत एकदा चपाती लाटून घ्यावी.
९. आता एका पॅनमध्ये तेल किंवा तूप सोडून ही चपाती दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी.
१ कपभर रव्याच्या ‘सालपापड्या’, छोटीशी पापडी हातभर फुलते- पारंपरिक पापडीची भारी रेसिपी...
मसाला चपाती खाण्यासाठी सर्व्ह करावी. ही मसाला चपाती लोणचं किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.