नवरात्रौत्सवाला मोठ्या धामधुमीत साजरा करण्याला सगळीकडे सुरुवात झाली आहे. या सणासोबतच येणारे उपवास हे देखील खास असतात. उपवास म्हटलं की आपल्याकडे उपवासाच्या पदार्थांची चर्चा सुरू होते. आत्ताच सुरु झालेल्या या नऊ दिवसांच्या उपवासाला नेमके काय काय खावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. यासोबतच घरच्या गृहिणींना तर हे मोठे आव्हानच असते की, रोज नऊ दिवस उपवासाचे नवीन नवीन काय पदार्थ बनवावेत. उपवासाचे पदार्थ म्हटलं की, आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या रेसिपी करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं(Quick Upvasache Pattice : Navratri Fasting Recipe).
उपवासाचे पदार्थ असंख्य आहेत. साबुदाण्याची खिचडी, वडे, राजगिरा थालिपीठ, रताळ्याचा किस, वरीचा भात असे अनेक पदार्थ आपण उपवासाला खातो. परंतु या नऊ दिवसांच्या उपवासात आपण काहीवेळा तेच ते नेहमीचे पदार्थ खाऊन बोर होतो. अशावेळी काहीतरी वेगळा नवीन चवीचा पदार्थ खावासा वाटतो. एरवी हलवाई किंवा स्नॅक्सच्या दुकानांत मिळणारे उपवासाचे फराळी पॅटिस (Farali Pattice : Indian Fasting Recipes) आपण खाल्लेच असतील. मस्त मऊ, लुसलुशीत उपवासाचे (Pattice for Fast) हे फराळी पॅटिस पाहिले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. हे फराळी पॅटिस नेमके बनवायचे कसे याची सोपी कृती पाहुयात(How To Make Farali Pattice At Home).
साहित्य :-
१. बटाटे - ४ (उकडवून घेतलेले)
२. मीठ - चवीनुसार
३. अरारुट पावडर - २ टेबलस्पून
४. हिरव्या मिरचीची पेस्ट - २ टेबलस्पून
५. मनुका - १ टेबलस्पून
६. काजू - १ टेबलस्पून
७. दाण्याचा कूट - १ टेबलस्पून
८. काळीमिरी पावडर - चिमूटभर
९. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
१०. किसलेलं सुक खोबर - २ टेबलस्पून
११. साखर - १ टेबलस्पून
१२. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. तेल - तळण्यासाठी
१४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...
कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...
कृती :-
१. सर्वातआधी उकडलेले बटाटे किसणीवर किसून त्याचा बारीक किस करुन घ्यावा. यात चवीनुसार मीठ व अरारुट पावडर घालून हे मिश्रण मळून घ्यावे.
२. त्यानंतर थोडासा किसलेला बटाटा घेऊन त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, मनुका काजू यांचे काप, दाण्याचा कूट, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस, किसलेलं सुक खोबर, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ घालून या पॅटिसच्या आतील स्टफिंग करून घ्यावे.
उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...
३. आता फराळी पॅटिसचे बाहेरचे आवरण व आतील स्टफिंग हे दोन्ही तयार झाल्यावर त्यांचे पॅटिस तयार करून घ्यावेत.
४. या पॅटिसच्या बाहेरच्या आवरणाच्या पिठाचा गोळा घेऊन त्याची गोल वाटी सारखी खोलगट पारी तयार करुन घ्यावी. त्यानंतर त्यात स्टँफिंगच्या मिश्रणाचा गोळा भरुन बाहेरच्या पारीचे तोंड बंद करून त्याला गोलाकार द्यावा.
५. आता हे तयार फराळी पॅटिस गरम तेलात खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
आपले गरमागरम फराळी पॅटिस खाण्यासाठी तयार आहेत. हे फराळी पॅटिस आपण दही किंवा उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.