आपल्याला कधीतरी क्रिस्पी, मसालेदार, चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. अशावेळी बाहेरचे वडे, भजी, पकोडे हे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. संध्याकाळच्या चहाबरोबर कुरकुरीत भजी, वडे, पकोडे खाण्याचा मोह कुणालाही आवरला जात नाही. परंतु सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. या दिवसात बऱ्याचजणांचा उपवास असतो. उपवासा दरम्यान आपण काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. उपवासा दरम्यान केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साबुदाणा आणि बटाटा (sabudana - aloo pakoda) हे पदार्थ कॉमन असतात. आपण फक्त या दोन पदार्थांचा वापर करुन उपवासाचे अनेक पदार्थ बनवू शकतो(Fasting Pakoda Recipe).
उपवासा दरम्यान रोज नऊ दिवस काय खायचे असा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. परंतु याचबरोबर संध्याकाळच्या चहाच्या वेळी जर आपल्याला भूक लागली तर अशावेळी आपण नेमकं काय खाव हे समजत नाही. एरव्ही आपण टी - टाईम स्नॅक्स म्हणून चिवडा, चकली, फरसाण असे पदार्थ खाऊ शकतो. परंतु उपवासा (Navratri Special Recipe) दरम्यान चहासोबत झटपट काहीतरी (Crispy fasting pakoda recipe) कुरकुरीत, चटपटीत करुन खाता येईल असे उपवासाचे पकोडे (How to make Fasting Pakoda) यंदा नक्की ट्राय करा. उपवासाचे हे झटपट होणारे पकोडे (Sabudana Pakoda) बनवायला अतिशय सोपे व घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अगदी पटकन होतात. उपवासाचे पकोडे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहूयात(Sabudana Pakoda Recipe – Fasting Snacks Recipe).
साहित्य :-
१. बटाटे - २ (उकडवून मॅश केलेले)२. साबुदाण्याचे पीठ - १/२ कप ३. शेंगदाण्याचा कूट - १/४ कप ४. हिरव्या मिरच्या - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेल्या)५. जिरे - १/२ टेबलस्पून ६. कोथिंबीर - ३ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)७. मीठ - चवीनुसार८. तेल - तळण्यासाठी
नवरात्र स्पेशल : फक्त १० मिनिटांत करा साबुदाणा आणि भगरीच्या पीठाचे घावन, उपवासाचा झटपट चविष्ट बेत...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये उकडून मॅश केलेले बटाटे घ्यावेत. २. यात साबुदाण्याचे पीठ, शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...
उपवासासाठी करा स्पेशल फराळी पॅटिस, मऊ - लुसलुशीत पौष्टिक पॅटिस करण्याची सोपी - झटपट रेसिपी...
३. आता एका कढईत तेल घेऊन ते चांगले गरम करुन घ्यावे. ४. तयार मिश्रणाचे छोटे - छोटे पकोडे बनवून ते गरम तेलात सोडून खरपूस रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यावेत. ५. तळून झाल्यानंतर हे पकोडे एका टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत.
आपले गरमागरम उपवासाचे पकोडे खाण्यासाठी तयार आहेत. हे पकोडे उपवासाची चटणी किंवा दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.