Join us  

गरमागरम वरणभात आणि तोंडी लावायला जवसाची चटणी, पावसाळ्यात ही पारंपरिक चटणी पोटाला बरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 8:32 PM

How To Make Flax Seeds Chutney At Home : Javasachi Chutney : जवस सुपरफूड मानले जाते, पावसाळ्यात तर जवसाची चटणी आहारात हवीच.

कोणतीही भारतीय जेवणाची थाळी विविध प्रकारच्या चटण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. चटणी भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सुक्या व ओल्या अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पराठा, डोसा, इडली, तळलेले पदार्थ असे अनेक पदार्थ आहेत जे चटणीसोबतच छान लागतात. जेवताना आपल्या पानांत चटणी असली की जेवणाची लज्जत वाढते, मग ती चटणी कोणतीही असो. आपल्या भारतीयांच्या जेवणामध्ये चटणी ही तोंडी लावायला असतेच. चटणी - भाकरी हे दोन्ही पदार्थ पूर्वीच्या लोकांना मिष्ठांन्ना सामान होते. ते चटणी भाकरी खाऊन दिवस काढत असत, आज देखील चटणीचे जेवणातील महत्व काही कमी झालेले नाही. 

चटणी बनवण्याचे विविध प्रकार आहेत. शेंगदाणा चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, खोबर्‍याची चटणी, लसूण खोबरे चटणी, कढीपत्त्याची चटणी, कैरीची चटणी यांखेरीस देखील अजून विविध प्रकारच्या चटणी भारतीय घरांत हमखास बनवल्या जातात. चटणी स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त यामध्ये पोषक तत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जेवायला बसल्यानंतर भात, भाजी, चपाती व्यक्तीरिक्त काहीतरी चटपटीत, तिखट तोंडी लावणीसाठी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. सहसा बहुतेक घरांमध्ये केली जाणारी जवसाची चटणी सगळ्यांच्याच खूप आवडीची आहे. भाजलेल्या जवसाची चटणी (Javasachi Chutney) अगदी कमीत कमी वेळात तयार होते आणि जास्त मेहनतही करावी लागत नाही. जर भाजी बनवली नसेल तर चपातीबरोबर, खिचडीबरोबर किंवा डाळ भातसह ही चटणी आपण खाऊ शकता(How To Make Flax Seeds Chutney At Home). 

साहित्य :- 

१. जवस - १ कप २. मीठ - चवीनुसार ३. लसूण पाकळ्या - ६ ते ७ ४. जिरे - १ टेबलस्पून ५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 

अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...

कृती :- 

१. सर्वप्रथम १ कपभर जवस घेऊन ते एका कढईत ओतून घ्यावेत. २. आता ही कढई गॅसच्या मंद आचेवर ठेवून २ ते ३ मिनिटे हे जवस कोरडे भाजून घ्यावेत. ३. भाजून घेतलेले जवस एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे. 

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

घरात विरजण नाही, बाहेरच्या दह्यानं चांगलं दही लागत नाही? १ सोपी ट्रिक, ५ मिनिटांत परफेक्ट विरजण...

४. जवस संपूर्णपणे थंड झाल्यानंतर ते एका भांड्यात ओतून घ्यावे. ५. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या ६ ते ७ पाकळ्या, जिरे, चवीनुसार मीठ व लाल तिखट घालावे. ६. आता मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवून त्याची बारीक वाटून सुकी चटणी होत नाही तोपर्यंत फिरवून घ्यावे. 

 जवसाची सुकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी एका हवाबंद काचेच्या बरणीत व्यवस्थित भरून ठेवल्यास किमान ६ महिने तरी चांगली टिकून राहते.

टॅग्स :अन्नपाककृती