Join us  

उन्हाळ्यात खा गारेगार फ्रूट कस्टर्ड, ५ टिप्स चूकून कधी कस्टर्ड, बिघडणार नाही, खा मनसोक्त....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 4:29 PM

Easy Homemade Fruit Custard Recipe : उन्हाळ्यात सतत गार खावेसे वाटत असेल तर करा एक मस्त पदार्थ

उन्हाळा म्हटलं की या ऋतूंत आपल्याला सतत काहीतरी थंड खावेसे वाटते. उन्हाळयात आपण बरेचदा आईस्क्रीम, शीतपेय, कोल्ड ड्रिंक्स, सरबत असे असंख्य पदार्थ खातो. शक्यतो जेवणानंतर आपल्याकडे काहीतरी गोड, थंडगार डेझर्ट खाण्याची अनेकांना सवय असते. या डेझर्ट प्रकारामध्ये, भारतात अतिशय लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे फ्रुट कस्टर्ड. थंडगार दुधामध्ये वेगवेगळ्या फळांचे तुकडे घालून हे गारेगार, गोड फ्रुट कस्टर्ड बनवले जाते. फ्रुट कस्टर्ड हे डेझर्ट बनवायला सोपे, खायला पौष्टिक असा झटपट होणारा थंडगार डेझर्टचा पदार्थ आहे. 

उन्हाळा आला की आपल्याला सतत काहीतरी थंड, गारेगार पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी आपण कुल्फी, आईस्क्रीम, शीतपेय, सरबत असे वेगवेगळे थंड पदार्थखाणे पसंत करतो. उन्हाळ्यात असे अनेक थंड पदार्थ खाणे म्हणजे पर्वणीच असते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपला जीव कासावीस होतो. गरमा  आणि वाढत्या उन्हामुळे वारंवार थंड खाण्याची इच्छा होतेच. या थंड पदार्थांमध्ये काहीतरी हेल्दी खायचा आपला मूड असेल तर फ्रुट कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे. फ्रुट कस्टर्ड अगदी लगेचं बनवून तयार होणारा तसेच घरातील सगळ्यांच्या आवडीचा थंड पदार्थ आहे. यंदाच्या उन्हाळ्यांत घरच्या घरीच झटपट फ्रुट कस्टर्ड बनवून या गोड, गारेगार पदार्थाचा आनंद लुटा(How To Make Fruit Custard At Home). 

साहित्य :- 

१. कस्टर्ड पावडर - ४ टेबलस्पून २. दूध - ४, १/२ कप ३. साखर - १/२ कप ४. सफरचंद - १ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)५. हिरवी द्राक्षे - १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले) ६. चिकू - १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले) ७. केळी - १/२ कप (बारीक कप करुन घेतलेले)८. काळी द्राक्षे - १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)९. डाळिंबाचे दाणे - १/२ कप १०. आपल्या  आवडीची फळे - बारीक तुकडे किंवा काप करून घेतलेली  

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात दूध घालावे आता दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्रित मिसळून घ्यावे. आता हे मिश्रण बनवून बाजूला ठेवून द्यावे.  २. आता दूध एका भांड्यात घेऊन व्यवस्थित उकळवून घ्यावे. ३. दूध व्यवस्थित उकळवून घेतल्यानंतर त्यात साखर आणि कस्टर्ड पावडरचे तयार करुन घेतलेले मिश्रण ओतून घ्यावे. या दुधात साखर आणि कस्टर्ड पावडरचे मिश्रण दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. 

द्राक्षांच्या मौसमात करायलाच हवे 'ग्रेप्स ब्लॉसम ', मन आणि शरीराला थंडावा देणारे गारेगार पेय - पाहा रेसिपी...

आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा....

४. दुधाचे हे मिश्रण किमान १० ते १५ मिनिटे मंद आचेवर हलकेच गरम करून घ्यावे. ५. हे मिश्रण त्यानंतर एका वेगळ्या बाऊलमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवावे. ६. हे मिश्रण संपूर्णपणे गार झाल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार सगळ्या फळांचे काप किंवा लहान तुकडे घालावेत. ७. आता हे तयार झालेले कस्टर्ड थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवून द्यावे. 

कस्टर्ड २ ते ३ तासानंतर संपूर्णपणे गार झाल्यावर खाण्यासाठी एका वेगळ्या बाऊलमध्ये सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृती