Lokmat Sakhi >Food > गारेगार, प्या गारेगार! विकतचे कोल्ड ड्रिंक वाढवतील वजन, एनर्जीसाठी प्या हे ‘समर कुलर ड्रिंक’!-पाहा रेसिपी...

गारेगार, प्या गारेगार! विकतचे कोल्ड ड्रिंक वाढवतील वजन, एनर्जीसाठी प्या हे ‘समर कुलर ड्रिंक’!-पाहा रेसिपी...

How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink : Refreshing Summer Drinks : Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks : उन्हाळ्यात होणारे त्रास टाळायचे तर सिझनल फळांचे 'समर कुलर ड्रिंक' प्यायला विसरु नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 16:12 IST2025-02-28T16:12:24+5:302025-02-28T16:12:48+5:30

How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink : Refreshing Summer Drinks : Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks : उन्हाळ्यात होणारे त्रास टाळायचे तर सिझनल फळांचे 'समर कुलर ड्रिंक' प्यायला विसरु नका...

How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink Refreshing Summer Drinks Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks | गारेगार, प्या गारेगार! विकतचे कोल्ड ड्रिंक वाढवतील वजन, एनर्जीसाठी प्या हे ‘समर कुलर ड्रिंक’!-पाहा रेसिपी...

गारेगार, प्या गारेगार! विकतचे कोल्ड ड्रिंक वाढवतील वजन, एनर्जीसाठी प्या हे ‘समर कुलर ड्रिंक’!-पाहा रेसिपी...

उन्हाळ्यात एकवेळ जेवण नको वाटतं, पण सतत काहीतरी थंडगार, शरीराला आणि मनाला थंडावा मिळेल असं खावं वाटतं, प्यावं वाटतं.. त्यामुळेच तर जवळपास सर्वच घरांमध्ये उन्हाळ्यात सरबतांची रेलचेल असते. उन्हाळ्यात आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे फारच गरजेचे असते. उन्हाळ्यात शक्यतो उन्हाळामुळे आपल्या शरीरातील (How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink) पाण्याचे प्रमाण कमी होते. उहाळ्यात कडक, रणरणत्या उन्हापासून (Refreshing Summer Drinks) स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण फळांचे रस, सरबत, पाणी असे द्रव पदार्थ जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करतो. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे आपल्याला सातत्याने तहान लागत रहाते. आपले शरीर सतत पाण्याची मागणी करत राहते(Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks).

उन्हातून आल्यानंतर किंवा गरमी वाढली की आपण फ्रिजमधील किंवा माठातील थंड पाणी पिणेच पसंत करतो. परंतु अशा कडक उन्हाळ्यांत पाण्यासोबतच इतरही लिक्विड पदार्थ पिणे आवश्यक असते. यासाठीच आपण उन्हाळ्यांत स्वतःला कुल ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या सिझनमध्ये मिळणाऱ्या फळांपासून एक मस्त हटके,आणि झटपट होणारे असे 'समर कुलर ड्रिंक' तयार करु शकतो. यंदाच्या उन्हाळ्यांत स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी 'समर कुलर ड्रिंक' नक्की करुन पाहा. 'समर कुलर ड्रिंक' घरच्या घरीच कसे तयार करायचे याची सोपी आणि इन्स्टंट रेसिपी mummagadekar या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

साहित्य :- 

१. शहाळ्याचे पाणी - २ कप 
२. बीटरुट - १/२ कप (किसून घेतलेलं)
३. सफरचंद - १/२ कप (लहान तुकडे केलेलं)
४. स्ट्रॉबेरी - १/२ कप (लहान तुकडे केलेले)
५. द्राक्षे - १/२ कप (लहान तुकडे केलेले)
६. अननस - १/२ कप (लहान तुकडे केलेले)
७. लिंबाचा रस - २ टेबलस्पून 

फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!


नेहमीची साधी केळीच खावी की वेलची केळी खाणं जास्त फायद्याचं? आहारतज्ज्ञाचं खरंखुरं उत्तर वाचा...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एक मोठी काचेची बाटली घ्यावी. 
२. या बाटलीत सगळ्यांत आधी तुम्हाला जितके सरबत तयार करायचे आहे तितके शहाळ्याचे पाणी ओतून घ्यावे. 
३. त्यानंतर यात आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या फळांचे लहान लहान तुकडे करून घालू शकतो.

४. आपण या शहाळ्याच्या पाण्यांत सफरचंद, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस यांसारख्या फळांचे लहान लहान तुकडे घालू शकतो. 
५. त्यानंतर एक गाळणी घेऊन त्यात बीटाचा किस घालून हाताने हलकेच दाब देत रस काढून घ्यावा. हा रस बाटलीत ओतावा. 
६. सगळ्यांत शेवटी यात लिंबाचा रस घालूंन सगळे जिन्नस चमच्याने हलवून घ्यावेत. 

उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि पोषक घटक देणारे हे थंडगार समर कुलर पिण्यासाठी तयार आहे. हे कुलर एक प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक देखील आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरेल.

Web Title: How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink Refreshing Summer Drinks Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.