Lokmat Sakhi >Food > हलवा करण्यासाठी गाजर किसण्याचा कंटाळा येतो? घ्या रेसिपी, गाजर न किसता करा हलवा

हलवा करण्यासाठी गाजर किसण्याचा कंटाळा येतो? घ्या रेसिपी, गाजर न किसता करा हलवा

How To Make Gajar Halva Without Grating: गाजराचा हलवा तर खूप आवडतो पण त्यासाठी गाजर किसत बसण्याचा मात्र जाम कंटाळा येतो. (most easy and very fast recipe of making gajar ka halva)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 16:16 IST2024-12-19T09:11:17+5:302024-12-19T16:16:23+5:30

How To Make Gajar Halva Without Grating: गाजराचा हलवा तर खूप आवडतो पण त्यासाठी गाजर किसत बसण्याचा मात्र जाम कंटाळा येतो. (most easy and very fast recipe of making gajar ka halva)

how to make gajar halva without Grating carrots, most easy and very fast recipe of making gajar ka halva | हलवा करण्यासाठी गाजर किसण्याचा कंटाळा येतो? घ्या रेसिपी, गाजर न किसता करा हलवा

हलवा करण्यासाठी गाजर किसण्याचा कंटाळा येतो? घ्या रेसिपी, गाजर न किसता करा हलवा

Highlightsगाजर न किसता गाजराचा हलवा अतिशय सोप्या पद्धतीने कसा करायचा, याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी साेशल मिडीयावर शेअर केली आहे.

हिवाळा म्हणजे 'गाजर का हलवा' करण्याचे दिवस.. कारण या दिवसांत लालबुंद, कोवळे गाजर बाजारात भरपूर प्रमाणात येत असतात. त्यामुळे ते गाजर पाहिले की अनेकांना गाजराचा हलवा खाण्याची इच्छा होते आणि मग गाजराच्या हलव्याची फर्माहिश होते.. आता गाजराचा हलवा करायचा म्हटलं की सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो गाजर किसत बसण्याचा.. कारण हे थोडं मेहनतीचं आणि वेळखाऊ काम आहे. त्यामुळे त्याचा जाम कंटाळा येतो आणि बऱ्याचदा तर फक्त तेवढ्या कारणासाठीच गाजर हलवा करण्याचं लांबवलं जातं. तुमचंही असंच होत असेल तर गाजर न किसता गाजराचा हलवा अतिशय सोप्या पद्धतीने कसा करायचा (most easy and very fast recipe of making gajar ka halva), याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी साेशल मिडीयावर शेअर केली आहे.(how to make gajar halva without Grating?)

 

गाजर न किसता गाजराचा हलवा कसा करावा?

साहित्य

गाजर सव्वा किलो 

३ टेबलस्पून तूप

पाव लीटर दूध

मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी 

१ कप साखर

१ टीस्पून वेलची पावडर

तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे काप २ ते ३ टेबलस्पून

१५० ग्रॅम खवा

 

कृती

सगळ्यात आधी गाजर धुवून त्याची सालं काढून घ्या. हलवा करण्यासाठी गाजर अगदी कोवळी असावे. जर ते जाडसर असतील तर त्याच्या आतला पिवळा भाग काढून टाकावा. गाजराचे लांब लांब उभे काप करून घ्या.

 

चेहऱ्यावरचे वांगाचे डाग घालविणारा सगळ्यात सोपा उपाय! ज्येष्ठमधाचा करा वापर- चेहरा होईल नितळ, सुंदर

त्यानंतर गॅसवर कुकर गरम गरायला ठेवा आणि त्यात तूप टाका. तूप गरम झाल्यानंतर गाजराचे काप कुकरमध्ये टाकून परतून घ्या..

एखादा मिनिट गाजर तुपामध्ये परतून घेतल्यानंतर त्यात दूध आणि साखर घाला. त्यानंतर कुकरचं झाकण लावून टाका. गॅस मोठ्या आचेवर ठेवून एक शिट्टी करून घ्या. त्यानंतर मध्यम आचेवर करून दुसरी शिट्टी होऊ द्या आणि मग गॅस बंद करा.

 

कुकरची वाफ गेल्यानंतर ते उघडा. गाजर उकडून मऊ झालेले असतील पण दूध मात्र तसंच असेल. त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून दूध आटवून घ्या.

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का? तज्ज्ञ सांगतात चहा प्या; पण 'हे' पथ्य पाळा... 

जसं जसं दूध आटत जाईल तसे तसे गाजर हलवा आणि मॅश करत राहा. जेव्हा दूध पुर्णपणे आटेल त्यावेळी त्यात सुकामेवा, वेलची पावडर आणि पाहिजे असल्यास खवा टाका. खवा न टाकताही हलवा खूप छान होईल. 


 

Web Title: how to make gajar halva without Grating carrots, most easy and very fast recipe of making gajar ka halva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.