आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये गरम मसाला हा असतोच. भारतीय पदार्थांमध्ये मसाले महत्वाची भूमिका बजावतात. मसाल्यांमुळे पदार्थाची चव वाढते. तिखट मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, गोडा मसाला यासारखेच विविध प्रकारचे मसाले बाजारात विकत मिळतात. वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर केला जातो. एखादा पदार्थ जर आपल्याला तिखट, झणझणीत, मसालेदार हवा असेल तर आपण त्यात गरम मसाला घालतो. गरम मसाला (Garam Masala) आजकाल बाहेरुन विकत तयार आणला जातो. परंतु आजही काही घरात किमान सहा महिने पुरेल इतका गरम मसाला ताजा तयार करून ठेवला जातो(how to make garam masala at home).
गरम मसाला घरीच तयार करायचा म्हटलं की त्यातील साहित्याच्या प्रमाणाचे अचूक गणित जमले पाहिजे. गरम मसाला ( how to make garam masala spice mix powder) करताना लागणारे साहित्य योग्य प्रमाणात घेतले तरच हा मसाला(homemade garam masala recipe) उत्तम तयार होतो. जर हे प्रमाण चुकले तर गरम मसाला फसतो. यामुळे मसाल्याची चव बिघडते. जर आपल्याला घरीच गरम मसाला तयार करायचा असेल तर त्याचे योग्य प्रमाण आणि कृती माहित असणे गरजेचे असते. घरच्याघरीच खडा मसाल्यांचा वापर करून गरम मसाला कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी शेअर केली आहे(How to make Garam Masala Powder at home).
साहित्य :-
१. धणे - ४ टेबलस्पून २. जिरे - ३ टेबलस्पून ३. काळीमिरी - ३ टेबलस्पून ४. दालचिनी - २ काड्या ५. जायफळ - १ अक्ख जायफळ ६. चक्रफूल - १७. जावेत्री - १ ८. काळी वेलची - ६ तुकडे ९. वेलची - १२ तुकडे १०. लवंग - १ टेबलस्पून ११. शहा जिरे - १ टेबलस्पून १२. तमालपत्र - ५ पानं
बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट
ऐन थंडीत करा पिवळ्या धम्मक मक्याचे पराठे, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-एक काय चार खा बिंधास्त!
कृती:-
१. सर्वातआधी एका गरम तव्यात धणे, जिरे, काळीमिरी घालून ते हलकेच कोरडे भाजून घ्यावेत. २. हे सगळे जिन्नस जास्त न भाजून घेता आपण ते हातात धरु इतकेच भाजून घ्यावेत. ३. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून संपूर्णपणे गार करून घ्यावे.
४. आता या बाऊलमध्ये दालचिनी, जायफळ, चक्रफूल, जावेत्री, काळी वेलची, वेलची, लवंग, शहाजिरे, तमालपत्र घालून सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावे. ५. त्यानंतर हे बाऊलमधील मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे
गरम मसाला तयार आहे. आता हा मिक्सरमधला वाटून घेतलेला गरम मसाला काढून एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावा.