दुपारच्या किवा रात्रीच्या जेवणाला तोंडी लावणीसाठी लसूण किंवा मिरचीची चटणी असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी. नावडती भाजी असेल किंवा तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर चटणीचा उत्तम पर्याय असतो. (What is chutney usually made of) चपाती, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही लसणाची चटणी उत्तम लागते. (How to make lasun chutney) भारतीय परंपरेत चटण्यांना विशेष स्थान आहे. चटण्यांशिवाय भारतीय थाळी पूर्णच होऊ शकत नाही. त्यात खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कांद्याची चटणी, कैरीची चटणी यांचा समावेश आहे. या चटण्या अगदी २ ते ३ पदार्थांपासून तयार होतात. (Garlic Chutney Recipe)
भाजलेल्या लसणाची चटणी कशी बनवायची?
भाजलेल्या लसणाची चटणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी लसूण आणि मिरची भाजून घ्या. भाजलेले लसूण आणि मिरची एका भांड्यात काढून त्यात लाल मिरची, जीरं आण मीठ घाला. हे साहित्य दळून त्यात लिंबू पिळा. तयार आहे झणझणीत लसूण चटणी.
भाजललेला लसूण खाण्याचे फायदे
भाजलेला लसूण खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. लसणात असलेले सल्फर कंपाऊंड अॅलिसिन तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तो नीट चावून खाल्ला जातो. सल्फर कंपाऊंडचे अनेक फायदे आहेत. लसणाच्या पाकळ्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात संशोधनात असे आढळून आले आहे.