Lokmat Sakhi >Food > भाजलेल्या लसणाची झणझणीत चटणी ५ मिनिटात करा; सोपी रेसिपी, जेवणाची वाढेल रंगत

भाजलेल्या लसणाची झणझणीत चटणी ५ मिनिटात करा; सोपी रेसिपी, जेवणाची वाढेल रंगत

How to make garlic chutney : खोबरे भाजल्यानंतर कढईतून काढून घ्या आणि नंतर लसूण थोडा भाजून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:20 PM2023-02-02T14:20:02+5:302023-02-02T14:35:11+5:30

How to make garlic chutney : खोबरे भाजल्यानंतर कढईतून काढून घ्या आणि नंतर लसूण थोडा भाजून घ्या.

How to make garlic chutney : Garlic chutney recipe ५ mins recipe | भाजलेल्या लसणाची झणझणीत चटणी ५ मिनिटात करा; सोपी रेसिपी, जेवणाची वाढेल रंगत

भाजलेल्या लसणाची झणझणीत चटणी ५ मिनिटात करा; सोपी रेसिपी, जेवणाची वाढेल रंगत

डाळ भाताबरोबर किंवा चपाती भाजीसोबत खाण्यासाठी लोणचं, चटणी असावी असं नेहमीच वाटतं. शेंगदाण्याची चटणी, पुदीना चटणी किंवा सुकी लाल चटणी तुम्ही अनेकदा ट्राय केली असेल.  भाजलेल्या लसणाची चटणी बनवायला अगदी सोपी आणि खायला स्वादीष्ट असते.  (What is garlic chutney made of) ही चटणी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. (How to make garlic chutney) लसूण भाजीत खायला कंटाळवाणा वाटत असेल तर तुम्ही असा प्रयत्न करू शकता. ज्यामुळे लसूणसुद्धा पोटात जातील आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील.

कृती

- सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवा आणि जिरे थोडेसे भाजून घ्या.

- जिरे भाजून घेतल्यानंतर खोबऱ्याचे काप भाजून घ्या. यावेळी गॅस मंद ठेवावा. खोबरे जास्त लालसर भाजू नका. नाहीतर चटणीला भाजकट, जळकट वास लागतो. 

- खोबरे भाजल्यानंतर कढईतून काढून घ्या आणि नंतर लसूण थोडा भाजून घ्या.

- खोबरे, लसूण, जिरे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. तिखट- मीठ टाका आणि चटणी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या. 

- चटणीला ओलसरपणा यावा म्हणून काही जण चटणी मिक्सरमधून फिरवतानाच त्यात अर्धा चमचा तेल टाकतात. तुम्हालाही ओलसर चटणी आवडत असेल तर तेल टाका.

- वरण भातासोबत जरी ही चटणी खाल्ली तरी तिची चव कमाल लागते.

Web Title: How to make garlic chutney : Garlic chutney recipe ५ mins recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.