लसूण हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा पदार्थ. भलेही त्याचे प्रमाण कमी- जास्त असेल. पण बहुतांश घरांमध्ये रोजच्या रोज लसूण लागतोच. कोणत्याही पदार्थाला लसणाचा छान खमंग तडका दिला की त्या पदार्थाची चव आणि सुगंध दोन्हीही वाढते. पण सध्या लसूण खूपच महाग झाला आहे. त्यातही गावरान लसूणाचे भाव तर खूपच वधारले आहेत. म्हणूनच आता लसूणाच्या टरफलांचाही सदुपयोग करा (How to make garlic peel powder). लसूणाच्या सालांमध्ये खूप गुणकारी घटक असतात. पण आपण ते सर्रास फेकून देतो (Benefits of garlic peel). आता महागाईच्या निमित्ताने या टरफलांची पावडर कशी करायची आणि स्वयंपाकात ती कशी वापरायची ते पाहूया...(How to use garlic peel powder in cooking?)
लसूणाच्या सालांचे फायदे
१. लसूणाच्या सालांमध्ये Phenylpropanoid antioxidants हा घटक असतो. बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यात त्याची मदत होते.
फक्त ताप आल्यावरच नाही, तर तब्येतीच्या 'या' ४ तक्रारी असतील तरी आंघोळ करणं टाळा
२. लसूणाच्या सालांमध्ये असणाऱ्या ॲण्टीऑक्सिडंट्समुळे एजिंग प्रक्रिया मंद होते.
३. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लसूणाची टरफलं उपयुक्त ठरतात.
लसूणाच्या सालांची पावडर कशी करायची?
लसूणाच्या सालांची पावडर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे.
सगळ्यात आधी तर लसूणाची सालं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
फक्त सेफ्टी पिन, सुई वापरून कंगवा स्वच्छ होत नाही, बघा कंगवा कसा आणि कधी स्वच्छ करावा
यानंतर ती उन्हामध्ये वाळायला ठेवा. एखादा दिवस उन्हात ठेवल्यानंतर सालं पुर्णपणे वाळली की मग मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करून ठेवा.
स्वच्छ, कोरड्या बाटलीमध्ये ही पावडर भरून ठेवल्यास कमीतकमी ६ महिने तरी ती चांगली टिकू शकते. फक्त त्यासाठी लसूणाची सालं पुर्णपणे कोरडी होऊ द्या.
स्वयंपाकात कशी वापरायची लसूणाच्या सालांची पावडर?
१. पराठा, पोळ्या, पुऱ्या करण्यासाठी पीठ भिजवताना तुम्ही त्यात ही पावडर टाकू शकता.
२. सूप करताना त्यात लसूणाच्या पाकळ्यांऐवजी सालांची पावडर टाका.
फक्त ३ पदार्थ वापरून ५ मिनिटांत तयार करा केमिकल्स फ्री वॉटरप्रुफ काजळ, बघा एकदम सोपी पद्धत
३. कोशिंबीर, सलाड करताना त्यावर गार्निशिंग म्हणून लसूण पावडर टाका. पदार्थांना छान चव येईल.
४. वरण, भाजी यामध्येही तुम्ही लसूणाच्या सालांची पावडर वापरू शकता.