Join us  

लसूण पटापट सोलण्याच्या ४ ट्रिक्स; लसणाचं चटपटीत लोणचं करा १० मिनिटात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 12:01 PM

How to make garlic pickle : लसणाची चटणी आपण अनेकदा जेवणात खातो. त्याचप्रमाणे लसणाचं लोणचंही चवीला अप्रतिम असतं.

जेवणाना डाळ भात किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी लोणचं असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी. चटणी, लोणचं असे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात आणि खाणाराही २ घास जास्त जेवतो. लसणात अनेक औषधी गुणधर्म असतात जे  रोगप्रतिराकशक्ती वाढवण्यास मदत करतात. (Garlic pickle recipe) लसणाची चटणी आपण अनेकदा जेवणात खातो. त्याचप्रमाणे लसणाचं लोणचंही चवीला अप्रतिम असतं. लसणाचं लोणचं करण्याची सोपी पद्धत पाहूया.  यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात हा पदार्थ तयार होईल. (How to make garlic pickle)

लसणाचं लोणचं कसं बनवावं?

लसणाचं चटपटीत लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा ते पाव किलो लसूण सोलून घ्या. लसूण पटकन सोलले जाण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.  इडली पात्र स्वच्छ धुवून त्यावर  पानं ठेवा नंतर लसूण ठेवा. लसूण वाफेवर शिजवून घ्या. शिजवलेले लसूण एका भांड्यात काढा.

ना मावा, ना दूध मूठभर शेंगदाण्यांची ७ मिनिटात करा बर्फी; तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

त्यात तुमच्याघरी उपलब्ध असलेलं कोणतंही लाल तिखट, लाल मसाला आणि हळद, मीठ घाला. त्यात एक लिंबू पिळून घाला. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी तळून घ्या. मोहोरीची फोडणी लसणांवर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. तयार आहे लसणाचं लोणचं.

लसूण लवकर सोलण्यासाठी काय करावं?

१) लसूण सोलण्याआधी तासभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर बाहेर काढून स्वच्छ पाण्यानं पुसा. नंतर एका प्लास्टीकवर ठेवून हलक्या हातानं दाबा लसूण लगेच सोलून निघेल.

२) लसूण लवकर सोलले जाण्यासाठी वरचा भाग काढून घ्या. यामुळे लसूण लवकर सोलला जाईल.

३) लसूण सोलण्याआधी ३० सेकंद मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवा यामुळे लसूण अगदी कमीत कमी वेळात सोलून होईल.

४) लसूण एका रिकाम्या डब्यात भरा आणि  हा डबा ४ ते ५ वेळा वर खाली हलवा.  असं केल्यानं डबा उघडताच लसणाचं साल निघून जाण्यास मदत होईल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स