Lokmat Sakhi >Food > आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...

आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...

How to Make Homemade Garlic Powder : How To Make Garlic Powder Quick & Easy Recipe : लसूण पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ लागतो आणि कंटाळाही येतो, आता करा एक सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 11:54 AM2024-06-25T11:54:53+5:302024-06-25T12:04:39+5:30

How to Make Homemade Garlic Powder : How To Make Garlic Powder Quick & Easy Recipe : लसूण पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ लागतो आणि कंटाळाही येतो, आता करा एक सोपी ट्रिक...

How to Make Garlic Powder from fresh garlic How to Make Homemade Garlic Powder | आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...

आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...

फोडणीसाठी लसूण हा लागतोच. लसणाशिवाय फोडणी देणे अशक्यच आहे. रोजची डाळ, भाजी, आमटी यांना फोडणी देण्यासाठी लसूण लागतोच. पदार्थांना चांगली चव येण्यासाठी आपण त्यात लसूण घालतो. लसूणाची खमंग फोडणी एखाद्या पदार्थात घातली की त्या पदार्थाची चव, स्वाद सगळंच बदलून जात. आपल्या रोजच्या स्वयंपाकात आपण बऱ्याचदा (How to make garlic powder without dehydrator or oven) लसूण वापरतो. रोज लसूण लागत असल्याने आपण बरेचदा तो एकदम एकाच वेळी सोलून स्टोर करून ठेवतो. लसूण पाकळ्या सोलणे हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम असते. याचबरोबर रोजच्या घाईगडबडीत लसूण सोलण्यासाठी पुरेसा वेळही नसतो. लसूण पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ लागतो आणि कंटाळाही येतो(How to Make Homemade Garlic Powder).

लसूण पाकळ्या सोलणे हे खूप कंटाळवाणे काम असल्याने बरेचदा आपण लसूण खाणे टाळतो. जर आपल्याला लसूण सोडणे हे अत्यंत किचकट आणि वेळखाऊ काम वाटत असेल, तर आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. या ट्रिकचा वापर केल्याने आपल्याला तासंतास लसूण सोलत बसावे लागणार नाही. याचबरोबर आपण किमान वर्षभरासाठी लसूण स्टोअर करून ठेवू शकतो. ही झटपट, सोपी ट्रिक कोणती आहे ते पाहूयात(how to make garlic powder Quick & easy recipe).

लसूण पावडर कशी बनवावी ? (Garlic Powder)

१. सर्वातआधी किलोभर लसूण पाकळ्या मोकळ्या करुन घ्याव्यात. त्यानंतर एका टोपात पाणी घेऊन त्यात या लसूण पाकळ्या सालीसहित घालाव्यात. आता एका मोठ्या चाळणीत लसूण पाकळ्या ठेवून त्यातील सर्व पाणी निथळून घ्यावे. पाणी निथळून गेल्यानंतर लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा जाडसर वाटून घ्यावा. 

२. हा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला लसूण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावा. हा वाटलेला लसूण डिशमध्ये वाळण्यासाठी ठेवून द्यावा. हा लसूण किमान ३ ते ४ दिवस उन्हात वाळण्यासाठी ठेवून द्यावा. लसूण वाळण्यासाठी ठेवलेल्या डिशला कॉटनचा कपडा बांधून उन्हांत ठेवून द्यावे. 

वर्षभर टिकेल अशी टोमॅटोची पावडर करा घरीच, भाजी- आमटीला येईल सुंदर स्वाद.. ताज्या टोमॅटोची चव...

महागामोलाच्या लिची पावसाळ्यात खराब होतात, ३ सोप्या ट्रिक्स- लिची भरपूर टिकतील-सडणार नाहीत...

३. उन्हात वाळल्यानंतर त्याच्या पाकळ्या आपोआप निघून जातील. आता हा वाळलेला लसूण मिक्सरमध्ये घालून पुन्हा एकदा बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावा. लसूण वाटून त्याची बारीक पूड झाल्यावर ही पूड चाळणीत ओतून व्यवस्थित चाळून घ्यावी. त्यानंतर ही पूड एका हवाबंद काचेच्या बरणीत भरुन स्टोर करून ठेवावी. 

आपण या लसूण पावडरचा वापर भाजी, आमटी, डाळ यांना फोडणी देण्यासाठी वापरु शकतो. किमान वर्षभरासाठी आपण या पावडरचा वापर करु शकतो. ही पावडर खराब होऊ नये म्हणून दर २ ते ३ महिन्यांतून एकदा एका मोठ्या परातीत काढून उन्हांत वाळवून ती परत स्टोअर करुन ठेवावी. या लसूण पावडरचा वापर केल्याने आपली रोज रोज लसूण सोलायची झंझट कायमची दूर होईल.

Web Title: How to Make Garlic Powder from fresh garlic How to Make Homemade Garlic Powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.