Join us  

फक्त २ वाटी सायीचं करा रवाळ तूप; विकतसारखं परफेक्ट तूप बनेल घरीच, घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 3:14 PM

How To Make Ghee At Home : बाजारात तूप आणयला गेलं तर ते किमान ६०० रुपये किलो असते, तसेच ते घरच्या तुपाप्रमाणे रवाळही नसते.

तूप हा अनेकांच्या आवडीचा विषय. गरम वरण-भातावर, पराठा किंवा पोळीवर किंवा अगदी अडीनडीला तूप साखर किंवा गुळ तूप खाण्यासाठी आपल्याला घरात भरपूर तूप लागतं. गोडाचे पदार्थ करण्यासाठी किंवा एखाद्या पदार्थाला फोडणी देण्यासाठीही आपल्याला तूप लागतं. हे तूप छान रवाळ असेल तर खायला छान वाटतं. आपण घरात रोज दूध आणतोच. त्याची साय साठवून तूप करणं ही फार काही अवघड गोष्ट नसते. पण कधी या साठवलेल्या सायीला वास येतो. तर कधी तूपाला वास लागतो आणि मग असे तूप कोणीच खात नाही (How To Make Ghee At Home). 

तूप करायचं म्हणजे रोज साय बाजूला टाकायची. मग ती साठली की त्यात विरजण घालायचं. ते लागलं की रवीने त्याचं लोणी काढायचं आणि मग त्याचं तूप इतकी सगळी प्रोसेस आली. पण असं न करता फक्त साय बाजूला टाकली आणि ती फेटली तरी लोणी येतं आणि त्याचं छान रवाळ सुगंधी तूप तयार होतं. बाजारात तूप आणयला गेलं तर ते किमान ६०० रुपये किलो असते, तसेच ते घरच्या तुपाप्रमाणे रवाळही नसते. पाहूयात अवघ्या २ वाटी तूपापासून लोणी करण्यासाठी काही खास टिप्स....

(Image : Google)

१. दररोज दूध तापवून झाल्यावर ते फ्रिजमध्ये ठेवा म्हणजे या दुधावर जाड भाकरीसारखी साय येईल. 

२. रोजच्या दुधाची ही साय एका बाऊलमध्ये काढून ठेवा. साधारणपणे ६ ते ७ दिवसांची म्हणजेच एका आठवड्याची २ वाटी साय जमा झाली की त्याचं तूप करु शकतो. 

३. ही साय एका मोठ्या भांड्यात काढून ती चमच्याने बराच वेळ हलवत राहा. हे काम आपण कोणाशी फोनवर बोलत असताना, टीव्ही पाहत असतानाही करु शकतो. त्यामुळे एकाच वेळात २ कामं होऊ शकतात. 

४. बराच वेळ साय हलवावी लागते. आवश्यकतेनुसार यात थोडे पाणी घालावे. त्यानंतर पाणी खाली राहून छान मऊसर लोणी आपोआप वर येईल.

५. एका पॅनमध्ये हे लोणी घेऊन ते मध्यम आचेवर चांगले गरम करा. हळूहळू यातील पाण्याचा अंश कमी होईल आणि रवाळ खमंग असे तूप तयार होईल.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.