Join us  

साजूक तूप कढवण्याची योग्य पद्धत पाहा, घरच्याघरी वाडगाभर सायीचं करा रवाळ-पांढरंशुभ्र तूप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 1:21 PM

How to make Ghee at home Recipe : लोणी दुसऱ्या भांड्यात काढावे. लोणी 2-3 वेळा स्वच्छ धुवून ते पाणी जमा झालेल्या ताकात मिसळावे.

जेवणात तुपाचा वापर अनेकांच्या घरी केला जातो. तूपाच्या सेवनानं तब्येतीला उत्तम फायदे मिळतात पण बाहेरून आणलेलं तूप भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. घरी बनवलेलं तूप चवीला उत्तम आणि तब्येतीलाही तितकंच पोषक असतं पण घरी तूप बनवण्याची योग्य पद्धत सर्वांनाच माहित नसते. (Which method of making ghee is best) घरी तूप बनवताना घरभर त्याचा वास पसरतो म्हणून काहीजण घरी बनवणं टाळतात  तर काहींना तूप बनवण्याची पारंपारीक पद्धत माहित नसते. घरच्याघरी रवाळ, सुवासिक तूप कसं बनवायचं ते पाहूया. (How to make ghee at home)

तूप बनवण्याची परफेक्ट पद्धत

1) घरच्याघरी तूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूध गरम करा. दूध थंड झाल्यानंतर साय काढून झाकून फ्रीज मध्ये ठेवावी. अशीच 3 दिवस साय साठवून ठेवावी. दरवेळी  नवी साय घातली की व्यवस्थित हलवून घ्या. जेणेकरून चव कडवट होणार नाही.

2) चौथ्या दिवशी साय घालावी आणि त्याच्या सोबत थोडे विरजण म्हणजे दही घालावे.आणि चांगले घवळून 5-6 तास साय फ्रीज बाहेरच ठेवावी. म्हणजे मलईला चांगले विरजण लागते.

3) दुसऱ्या दिवशी सकाळी साय फ्रीज मध्ये ठेवून द्यावी आणि दररोज येणाऱ्या दुधावरच्या सायीमध्ये घालून रोजच्या रोज चांगले मिसळून घ्यावे, म्हणजे वरची साय चांगली मिसळली जाते आणि पिवळी होत नाही, कडवट होत नाही किंवा बुरशी येत नाही.

4) पुरेशी साय जमा झाली की जमा झालेले सायीचे दही बेर काढून घुसळून घ्यावे. पाणी न घालता आधी चांगले घुसळून घ्यावे.  थोडा तेलकट थर जमा होतोय असे वाटू लागले की थंड पाणी मिसळावे, थंडाव्यामुळे लोणी एकत्र येऊन वर गोळा होतो.

5) लोणी दुसऱ्या भांड्यात काढावे. लोणी 2-3 वेळा स्वच्छ धुवून ते पाणी जमा झालेल्या ताकात मिसळावे.

6) तयार लोणी मंद आचेवर जाड तळाच्या भांड्यात कढवण्यासाठी ठेवावे. सुरुवातीला पाणी सुटून फेस येतो, पाण्याचा आवाज कमी होईल तसा तूप कढले असे समजावे, मध्ये मध्ये ढवळून घ्यावे.

7) पाण्याचा आवाज कमी झाला की गॅस बंद करून त्यात तुळशी पान / खाऊचे पाने / खडे मीठ  घालावे, थोडा पाण्याचा शिंतोडा देवून झाकून ठेवावे.

8) थंड झाले की गाळून काचेच्या बरणीत किंवा स्टील च्या डब्यात भरून ठेवा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न