Lokmat Sakhi >Food > How to make ghee at home : एक वाटी सायीपासून घरीच करा रवाळ, साजूक तूप; 'ही' घ्या घरी तूप बनवण्याची परफेक्ट रेसेपी

How to make ghee at home : एक वाटी सायीपासून घरीच करा रवाळ, साजूक तूप; 'ही' घ्या घरी तूप बनवण्याची परफेक्ट रेसेपी

How to make ghee at home : भेसळयुक्त तूप तब्येतीसाठी हानीकारक ठरतच पण त्यातून कोणताही पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:53 PM2022-04-08T12:53:52+5:302022-04-08T13:22:24+5:30

How to make ghee at home : भेसळयुक्त तूप तब्येतीसाठी हानीकारक ठरतच पण त्यातून कोणताही पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.

How to make ghee at home : Steps of ghee making at home | How to make ghee at home : एक वाटी सायीपासून घरीच करा रवाळ, साजूक तूप; 'ही' घ्या घरी तूप बनवण्याची परफेक्ट रेसेपी

How to make ghee at home : एक वाटी सायीपासून घरीच करा रवाळ, साजूक तूप; 'ही' घ्या घरी तूप बनवण्याची परफेक्ट रेसेपी

भारतात प्रत्येकाच्याच घरात तेल (Pure Ghee) तुपाचे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट असतात. अनेक घरांमध्ये चांगलं तूप म्हणजेच साजूक तूप खाण्याची खूप आवड असते. नैवेद्याच्या पदार्थांमध्ये,  गोड पदार्थांमध्ये, पोळीला लावून तर कोणाला वरण भातावर तुपाचे दोन-तीन थेंब हवेच असतात. बाहेरून तूप विकत घेताना अनेकदा ते भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. (How to make toop at home)

भेसळयुक्त तूप तब्येतीसाठी हानीकारक ठरतच पण त्यातून कोणताही पोषक घटक शरीराला मिळत नाहीत. दूधाच्या सायीपासून घरीच तूप बनवल्यास तुम्हाला अस्सल चवीचं साजूक तूप चाखायला मिळू शकतं. घरी तूप बनवायला खूप वेळ लागतो, घरभर तुपाचा वास येतो, तर कधी पुरेसं तूप निघत नाही म्हणून लोक घरी तूप बनवणं टाळतात. (How do make ghee locally?)

पण जर तुम्ही  तूप बनवण्याआधी काही ट्रिक्स लक्षात वापरल्या आणि तूप बनवण्याची योग्य पद्धत माहीत करून घेतली तर जास्त मेहनत न घेता भरपूर तूप घरीच बनवता येऊ शकतं. म्हणूनच या लेखात तुम्हाला तूप बनवण्याच्या वेगवेगळ्या सोप्या पद्धती दाखवणार आहोत. (Steps To Make Ghee at At Home)

साहित्य

१ मोठा वाडगा दुधाची साय

तूप गरम करण्यासाठी भांडं

लोणी घुसळण्यासाठी भांडं

घरी तूप बनवणं फारचं कठीण नाही. त्यासाठी तुम्हाला आधी पूर्व तयारी करावी लागते. रोज दूध तापवल्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याची साय काढून एका भांड्यात साठवा. सायीचे भांडे नेहमी फ्रीजमध्ये झाकण घालून मगच ठेवा. झाकण न ठेवल्यास साय  हिरवट रंगाची दिसायला लागते. 

पुरेशी साय साठवल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून ठेवा. (जितकी साय असते त्याचा निम्मा भाग तूप निघतं) 
साय भांड्यात काढल्यानंतर रवीने चांगलं घुसळा. हळूहळू त्यावर लोणी दिसायला लागले. एका चमच्याने हे लोणी बाजूला काढून घ्या. 

लोणी काढू झाल्यानंतर घुसळलेल्या साईचे भांडे मंचआचेवर गॅसवर ठेवा. हळूहळू या मिश्रणाला उकळी फुटेल आणि तुप तयार व्हायला लागेल. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे मिश्रण ढवळत राहा.  
संपूर्ण तूप तयार झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्यानं एका स्वच्छ भांड्यात तूप काढून घ्या.  काहीवेळानं ते सेट होईल तूप थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रिजमध्येही ठेवू शकता. 

१)

२)

३)

Web Title: How to make ghee at home : Steps of ghee making at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.