साजूक तूप म्हणजे आरोग्यासाठी वरदान (Ghee Recipe). साजूक तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. तूप हा निरोगी फॅट्चा स्त्रोत आहे, प्रामुख्याने सॅच्युरेटेड फॅट्स आणि फॅटी ॲसिडचा स्त्रोत आहे (Cooking Tips). तूप हे ए, ई आणि डी सारखे चरबी विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. जे संपूर्ण आरोग्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
पण सध्या तुपामध्येही भेसळ केली जाते. त्यामुळे विकतचे तूप खावे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला विकतचे तूप खायचे नसेल तर, घरगुती तूप तयार करा. काहींच घरात तूप तयार करताना गणित चुकतं. शिवाय घरभर तुपाचा वासही पसरतो. जर आपल्याला मेहनत न घेता, तूप तयार करायचं असेल तर या रेसिपीला फॉलो करा(How to Make Ghee - Easy Homemade Ghee Recipe).
तूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
मलाई
वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..
पाणी
या पद्धतीने तयार करा साजूक तूप
सर्वात आधी मलाई जमली की एका भांड्यात काढून घ्या. रवीने किंवा इलेक्ट्रिक बिटरने घुसळा. हळूहळू त्यावर लोणी साठायला सुरवात होईल. लोणी चमच्याने बाजूला काढा. जमा झालेले लोणी एका टोपात काढून घ्या. त्यात पाणी घाला. आणि मलाई गोळा धुवून घ्या.
मलाईचा गोळा एका भांड्यात काढून घ्या. भांडं गॅसवर ठेवा. गॅस मंद आचेवर ठेवा. गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत हळू हळू चमच्याने हलवून लोणी तापवून घ्या. लोणी पूर्णतः वितळल्यानंतर गॅस बंद करा.
लग्नाआधी भावी जोडीदाराला विचारा ३ प्रश्न; संसार होईल सुखाचा - जुळून येतील रेशीमगाठी
एका बरणीवर चहाची गाळणी ठेवा. त्यात तूप गाळून घ्या, आणि बरणी बंद करा. अशा प्रकारे आपलं घरगुती रवाळ दाणेदार तूप रेडी. स्टोअर करून ठेवल्यास तूप महिनाभर आरामात टिकेल.